Saturday, March 13, 2021

SPJIMR आणि फिक्की-फ्लो मुंबई’च्या वतीने ‘विमेन ऑन्त्रप्रीन्यूअरशीप इन इंडिया’वर श्वेतपत्रिका प्रसिद्ध

·         व्यवसायात आढळणाऱ्या नकारात्मक लिंग-आधारीत भेदभावात कुटुंब आणि सामाजिक हस्तक्षेपाची शिफारस

·         महिला सहभागाला चालना मिळण्याच्या उद्देशाने आर्थिक परिसंस्था, नवीन ज्ञान आणि नेटवर्कची उपलब्धता तसेच साजेशा सरकारी धोरणांची शिफारस

मुंबई, 12 मार्च, 2021: भारतीय विद्या भवन’चे SPJIMR हे भारतातील अग्रगण्य बिझनेस स्कूल असून फिक्की-फ्लो मुंबई या फिक्की उद्योग समितीच्या स्त्री संघटनेसोबत भागीदारीत ‘‘विमेन ऑन्त्रप्रीन्यूअरशीप इन इंडिया – नेवेगेटींग सोशल पॅराडॉक्सेस शीर्षकाची श्वेतपत्रिका प्रकाशित केली. यामध्ये भारतातील महिला उद्योजिका आणि समाजातील अंतर्विरोधाचे संचालन हा विषय हाताळण्यात आला. या श्वेतपत्रिकेचे प्रकाशन नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांच्या हस्ते ‘द गेम चेंजर्स – विमेन स्टार्ट-अप अॅवॉर्डस 2021’ मध्ये करण्यात आले. हा पुरस्कार सोहळा महिला उद्योजकांच्या कार्याचा गौरव करण्याच्या दृष्टीने आयोजित करण्यात आला होता. “भारताच्या स्टार्ट-अप वातावरणात आगामी महात्सुनामी महिला उद्योजक आणतील” असे उदगार श्वेतपत्रिकेचे औपचारीक प्रकाशन करताना नीति आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी काढले.  

देशांच्या प्रगतीत महिला उद्योजकांची भूमिका यावर जगभरात काही चर्चा घडत आहेत. तरीच हा विषय भारताने चांगल्या पद्धतीने समजून घेण्याची आवश्यकता आहे. ताज्या ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट अनुसार, वर्ल्ड इकनॉमिक फोरम 2020 मध्ये 153 देशांच्या यादीत भारताची घसरण 149 व्या क्रमांकापर्यंत झाली. भारत हा एक झपाट्याने वाढणारी अर्थव्यवस्था असून जर देशाच लैंगिक समानतेच्या दिशेने प्रगतीचा वेग असाच राहिला तर 2025 पर्यंत जीडीपीमध्ये $700 अब्जाची भर पडू शकते.

भारतात महिला उद्योजिकांसमोर असलेली आव्हाने जाणून घेण्यासोबत धोरणकर्ते, उद्योगातील जाणकार आणि तज्ज्ञांकडून शिफारसी गोळा करण्याचे या संशोधनाचे उद्दिष्ट आहे. या अभ्यासात 20 सखोल-सविस्तर मुलाखतींचा समावेश आहे. तसेच संपूर्ण भारतातून 100 हून अधिक महिला उद्योजिकांचे विस्तृत सर्व्हेक्षण करण्यात आले. ज्याला शैक्षणिक संशोधनाची जोड लाभली. या अहवालाने तीन प्रमुख पैलू जसे की, स्वत:, कुटुंबाची भूमिका तसेच व्यावसायिक परिसंस्थेवर शिफारसी सुचवल्या. 

या भागीदारीचा शुभारंभ फिक्की-फ्लो मुंबईच्या अध्यक्षा मालू नटराजन यांनी केला. यावेळी त्या म्हणाल्या की, “महिलांमधील उद्योजकेतेने सामाजिक आणि वैयक्तिक परिवर्तन घडून येऊ शकते”.

या अभ्यासातून स्पष्ट होणारा दृष्टिकोन SPJIMR च्या डॉ. सुमिता दत्ता यांनी स्पष्ट केला. त्या म्हणाल्या की, “समाजाच्या गरजा पूर्ण करण्याचा बृहद उद्देश महिला उद्योजकांनी नजरेसमोर धरला पाहिजे”.

या अहवालातून स्पष्ट झाले की, महिलांचा समावेश मोठ्या प्रमाणावर व्यवसाय परिघात करण्याच्या हेतूने सरकारने काही उपक्रमांची घोषणा केली. मात्र, तरीही महिला उद्योजिकांना नकारात्मक भेदभावाचा सामना करावा लागला. वास्तविक‘Navigating the Social Paradoxes’ (समाजातील अंतर्विरोधाचे संचालन) या शीर्षकाची निवड मुद्दाम करण्यात आली. कारण “महिला उद्योजिकांना अदृश्य आव्हानांचा सामना करावा लागतो, कारण आपल्या समाजाची बैठक काही चुकीच्या समजुतींवर आधारीत आहे, हे या अभ्यासातून समोर येते”, असे SPJIMR च्या प्रा. रतिका गोरे यांनी स्पष्ट केले.

या संदर्भात अधिक खोल जात SPJIMR चे डॉ. राजीव अगरवाल म्हणाले की, “भारतात महिला उद्योजकांचा उदय होण्यात सहभागी घटक आणि कुटुंब यांच्यातील नाते संबंध मोलाची भूमिका बजावतात किंवा ते अधिक आव्हानात्मक ठरते”

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने विविध उपक्रम आणि कार्यक्रमांची सुरुवात केली. जसे की, महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देण्याकरिता स्टार्ट-अप इंडिया’ची सुरुवात केली. तरीच अशा योजनांविषयी जागरुकता आणि त्यांच्यापर्यंत पोहोच यासाठी ठोस लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे ठरते. महिलांना समर्पक नेटवर्क उपलब्ध करून, त्यांना स्वीकारणाऱ्या उपक्रमांना चालना देणे, तसेच योग्य आर्थिक पाठबळ मिळवून देणे, तंत्रज्ञान आणि डिजिटल मंचाचा वापर यासंबंधी नवीन ज्ञान पुरवल्याने महिला उद्योजक प्रगतीचा एक-एक टप्पा पार करतील.

No comments: