Tuesday, August 4, 2020

नेटाफिम सध्याच्या पीकचक्रासाठी शेतक-यांपर्यंत पोहोचत आहे लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून

~ नेटाफिमचे कृषीशास्त्रज्ञ ज्ञान व कौशल्यांच्या आदानप्रदानासाठी ज्ञानाधारित मालिका व कण्टेंट लायब्ररीच्या माध्यमातून भारतीय शेतक-यांसोबत थेट संवाद साधत आहेत ~ मुंबई, ४ ऑगस्ट २०२०: नेटाफिम इंडिया ही नेटाफिमची संपूर्ण मालकी असलेल्या उपकंपनी शाश्वत उत्पादकतेसाठी आधुनिक सिंचन उत्पादने देणारी आघाडीची जागतिक कंपनी आहे. या कंपनीने डिजिटल क्रांती व कमी खर्चाच्या डिजिटल साधनांचा लाभ घेत शेतक-यांशी विविध प्लॅटफॉर्म्स आणि फॉरमॅट्समार्फत संवाद साधण्याच्या उद्देशाने नेटाफिम कृषी संवाद, नेटाफिम की पाठशाला आणि नेटाफिम टिप ऑफ द डे हे उपक्रम सुरू केले आहेत. नवीन डिजिटल अध्ययन आणि कण्टेंट अनुभवाची सुरुवात करणा-या या उपक्रमांमुळे ग्राहक व सहयोगींना कुठूनही नेटाफिममधील तज्ज्ञांशी संपर्क साधून कल्पनांचे आदानप्रदान करण्याची संधी मिळाली आहे. कोविड-१९ साथीमुळे प्रत्यक्ष संपर्कावर मर्यादा आलेल्या असताना, ऑडिओ, टेक्स्ट आणि व्हिडिओ मेसेजिंगसारखी माहितीचे आदानप्रदान करणारी डिजिटल साधने, शेतक-यांपर्यंत महत्त्वाची माहिती पोहोचवण्यात अत्यंत प्रभावी ठरत आहेत. कंपनीने अत्यावश्यक पेरणीपूर्व बाबींशी संबंधित सल्लागार सेवेच्या माध्यमातून आत्तापर्यंत देशभरातील ८.५ दशलक्ष शेतक-यांचा एक समुदाय तयार केला आहे. गेल्या ६० दिवसांच्या ऑनलाइन संवादातून नेटाफिमने त्यांच्या सोशल मीडिया साइट्सवर सुमारे ९,५७६ सदस्य प्राप्त केले आहेत (वापरकर्त्यांमध्ये ४५ टक्के वाढ). नेटाफिम इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक रणधीर चौहान या उपक्रमाबद्दल म्हणाले, “नेटाफिम इंडिया कायमच भारतीय शेतक-यांची सांस्कृतिक मानववंशशास्त्रज्ञ म्हणून काम करत राहिली आहे. हे उपक्रम कार्यान्वित करण्यापूर्वी आम्ही आमचे प्रेक्षक डिजिटल प्लॅटफॉर्म्स कसे वापरतात याचे परीक्षण केले, जेणेकरून आम्ही त्यांच्यापर्यंत सहज पोहोचेल असा कण्टेंट डिझाइन करू शकू आणि त्यांच्याशी संवाद साधणे सोपे होईल. आज आधुनिक तंत्रज्ञानाच्या सर्वव्यापी लाभांमुळे एतद्देशीय पद्धतींनी समृद्ध व स्थानिक संदर्भांनी युक्त असे शास्त्रशुद्ध ज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचवणे शक्य झाले आहे. ऑनलाइन वापरकर्त्यांची संख्या वाढल्याचा अधिकाधिक लाभ घेण्यासाठी आम्ही दुर्गम भागातील शेतक-यांना विविध पिकांविषयीचा महत्त्वाचा सल्ला योग्य वेळी व त्यांच्या स्थानिक भाषांमध्ये देण्याचा निर्णय घेतला.” कंपनीच्या कृषीशास्त्रज्ञांनी नेटाफिम कृषी संवाद या बहुभाषिक वेबिनार्सच्या चैतन्यपूर्ण मालिकेद्वारे शेतक-यांशी संवाद साधला आणि संभाव्य विस्तारीकरणासाठी यशोगाथांची उदाहरणे त्यांच्यापुढे ठेवली, नवीन कल्पना स्पष्ट केल्या. फेसबुकसारख्या सर्वांत लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून, शेतक-यांना कापूस, हळद व केळीचे उत्पादन वाढवण्याकरिता ठिबक सिंचन प्रणालींच्या लाभांबद्दल शिक्षित करण्यात आले. प्रत्येक पीकचक्रासाठी जमिनीच्या मशागतीपासून सुरुवात करून पेरणी, ठिबक सिंचन संचाची निवड व पाण्याचे व्यवस्थापन ते खत वापर या सर्व विषयांवर ज्ञानाधारित मालिकांमधून मुद्देसुद माहिती देण्यात आली.

No comments:

Indian Red Cross Society Felicitates REC Foundation with ‘CSR Award of Appreciation’

 Honour presented by Shri Gulab Chand Kataria, Hon’ble Governor of Punjab Recognizing its exceptional contribution to healthcare accessibili...