पीएनजी ज्वेलर्स’च्या नवीन स्टोअरचे औरंगाबादमध्ये उद्‌घाटन

औरंगाबाद मधील हे दुसरे स्टोअर, वर्षाअखेर आणखी दोन स्टोअर्स सुरू करण्याचे उद्दिष्ट 

  • लॉकडाऊननंतर ब्रँडची विस्तार योजना पुन्हा पूर्व पदावर 
 
औरंगाबाद, ३१ ऑगस्ट २०२० : भारतातील सर्वात विश्वासार्ह ज्वेलरी ब्रँड असलेल्या ‘पीएनजी ज्वेलर्स’ने औरंगाबादमधील आपल्या दुसर्‍या स्टोअरचे उद्‌घाटन केले आहे. या नवीन स्टोअरसह  ‘पीएनजी ज्वेलर्स’च्या जगभरातील स्टोअर्सची संख्या ३९ झाली आहे. या स्टोअरच्या उद्‌घाटन प्रसंगी ‘पीएनजी ज्वेलर्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ ,  'पीएनजी ज्वेलर्स ' चे     संचालक पराग गाडगीळ ,  यांच्यासह औरंगाबादमधील प्रख्यात   सिंघवी , बोरा आणि पापडीवाल  परिवारातील  सदस्य उपस्थित होते. अद्ययावत सुविधांनी युक्त  ‘पीएनजी ज्वेलर्स’चे नवीन स्टोअर प्रशस्त अशा २६०० चौरस फूट जागेत विस्तारलेले असून  येथे सोने, चांदी आणि डायमंडच्या दागिन्यांची विस्तृत श्रेणी उपलब्ध असेल.

या प्रशस्त स्टोअरमध्ये आधुनिक काळातील स्त्रियांसाठी उत्कृष्ट समकालीन दागिने उपलब्ध आहेत. हे स्टोअर औरंगाबादच्या काल्डा कॉर्नर येथे असून, औरंगाबाद व परिसरातील ग्राहकांच्या वाढत्या गरजांची पूर्तता करेल, असा विश्वास यावेळी गाडगीळ यांनी व्यक्त केला.

या  स्टोअरची रचना इतर ‘पीएनजी ज्वेलर्स’ स्टोअर्स प्रमाणेच असून ब्रँड तर्फे प्रदान करण्यात येणारी उच्च मानकांच्या सेवेचा लाभ इथंही घेता येईल. सुरक्षित आणि चिंतामुक्त खरेदीचा अनुभव ग्राहकांना देण्यासाठी ‘पीएनजी ज्वेलर्स’ने सर्व उपाययोजना केल्या आहेत. स्टोअरच्या उद्‌घाटननिमित्त केवळ काल्डा स्टोअरमध्ये येणाऱ्या ग्राहकांसाठी डायमंड ज्वेलरीवर च्या घडणावळीवर ५०% पर्यंत सवलत आणि सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर १५% पर्यंत सवलत  मिळू शकेल. ही ऑफर ३० ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२० दरम्यान उपलब्ध असेल.

‘पीएनजी ज्वेलर्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले की, “महामारीमुळे बाजारपेठेत सर्वत्र नकारात्मकता निर्माण झाली आहे; परंतु यात नक्कीच सुधारणा होत आहे. आमचा ठाम विश्वास आहे की आपण सकारात्मक बाजूकडे पाहणे आवश्यक आहे आणि आपले मूल्य आणि कठोर परिश्रमांच्या आधारावर दृढ विश्वास ठेवून पुढं जाणं आवश्यक आहे. औरंगाबादमधील आमच्या पहिल्या स्टोअरला आता आठ वर्षं पूर्ण झाली असून लोकांनी  आमच्यावर केलेले प्रेम आणि दाखवलेल्या विश्वासामुळे हे शक्य झाले आहे. भक्कम उद्योग व कृषी समृद्ध असे हे शहर प्रगतीची सुप्त ऊर्जा बाळगून आहे. येथे दागिन्यांसाठी चांगली मागणी आहे. महाराष्ट्रातील निमशहरी भागात आणि छोट्या शहरांमध्ये या व्यवसायासाठी सुप्त सामर्थ्य आहे. राज्यात जिथे आम्ही भक्कम पाय रोवले आहे आणि जिथे आमची सांस्कृतिक मुळे खोल रुजली आहेत, तिथे व्यवसायाच्या शक्यता उल्हसित करणाऱ्या आहेत. सणासुदीचा काळ जवळ येत असताना औरंगाबादकरांना लग्नाच्या आणि दिवाळीच्या हंगामात आमच्या दुसऱ्या स्टोअरची सुरूवात करण्याचे आश्वासन आम्ही पूर्ण करीत आहोत. ‘पीएनजी ज्वेलर्स’ने अनेक पिढ्यांपासून आपल्या ग्राहकांना त्यांचा वेळ, पैसा आणि विश्वासाला साजेसा असा खरेदी अनुभव देण्याचा प्रयत्न केला आहे आणि आम्ही हा अनुभव या नव्या स्टोअरसह येथे देण्यास उत्सुक

Comments

Popular posts from this blog

Tamasha World HD premier on &pictures HD

Here are 5 age defying love stories on Hindi television that proved that love has no age-bar.

Home First Finance Company India Ltd on boards GALF for Holistic Wellbeing of Employees