Posts

Showing posts with the label Maharashtra Labour bureau

महाराष्ट्र कामगार ब्युरोचे कामगार संघटनांकडून स्वागत , उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी घेतला आढावा

दि. २० भांडवली व पायाभूत सुविधांबरोबरच कामगार हा घटक उद्योग विश्वाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. भूमिपुत्रांना संधी देताना उद्योग विश्वाला कुशल-अकुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी कामगारवर्गाची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र कामगार ब्युरो ही संकल्पना साकारली जात आहे. आज कामगार संघटनांकडून याचे उस्फुर्त स्वागत करण्यात आले.    उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आज कामगार ब्यूरोसंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आज कामगार संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, आमदार भाई जगताप, विनोद घोसाळकर, जयप्रकाश छाजेड, शिवाजीराव गटकळ, उद्योग विभागाचे सचिव वेणुगोपाल रेड्डी, हर्षदीप कांबळे आदी उपस्थित होते.  सुभाष देसाई म्हणाले की, कोरोनाचा अर्थचक्रावर होणार परिणाम किती काळ राहील हे सांगता येत नाही. परंतु महाराष्ट्र शासानाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी पा...