Posts

Showing posts with the label Post office

पोस्टाचे कर्मवीर Corona Warriors from Indian Postal Department

Image
पोस्ट विभागाने लॉकडाऊन सुरु झाल्यापासून २३ मार्च ते २३ एप्रिल या महिन्याच्या कालावधीत नागरिकांसाठी अत्यावश्यक सेवा सुरु ठेवल्या आहेत. नवी मुंबई रिजनच्या विभागाअंतर्गत, रायगड, पालघर, ठाणे, नवी मुंबई, नाशिक आणि मालेगाव जिल्यात एकूण १५१४ पोस्ट ऑफिसेस सुरु ठेवण्यात आली आहेत आणि आवश्यक ते मनुष्यबळ, पोस्टाचे व्यवहार करण्यासाठी पुरवण्यात आले आहे. १. या कालावधीत नागरिकांना बचत खात्याच्या विविध योजना, इंडिया पोस्ट पेमेंट बँक च्या आधार आधारित देय सेवांसारख्या विविध योजनांअंतर्गत, त्यांच्या बँक खात्यातून ८६,६९८ इतक्या लोकांना रु. १६४ करोड चे वितरण करण्यात आले. २. तसेच १४२९ इतक्या मनी ऑर्डर साठी रु. ३०.५७ लाख वितरित करण्यात आले. लॉकडाउन च्या काळात घरबसल्या पोस्टमन आणि ग्रामीण डाकसेवकांनी घरोघरी जाऊन गरजू ग्राहकांना मदत केली. ३. पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून औषधी उपकरणे, मास्क, सॅनिटायझर्स , पी पी पी किट्स, आणि औषधे यांचे ३५०० पार्सलचे बुकिंग तसेच १०,००० पत्रांचे वितरण करण्यात आले. ४. सामाजिक कल्याण म्हणून मजूर, स्थलांतरित, लोकांसाठी एक लाख रुपयांचे भोजन व राशनचे वेगवेगळ्या भागात वाट...