वाशी येथे MOC Cancer Care & Research Centre च्या उद्घाटनावेळी महापौर संजीव गणेशजी नाईक यांनी परवडणाऱ्या कॅन्सर उपचारांची गरज अधोरेखित केली

 

M|O|C कॅन्सर केयर मार्फत वाशी येथे अत्याधुनिक कॅन्सर उपचार केंद्राचे लोकार्पण.

वाशी येथील नवे उपचार केंद्र हे एम ओ सी कॅन्सर केयर संस्थेचे मुंबई महानगर (MMR) विभागातील दहावे केंद्र असून, अत्याधुनिक उपचार, सुरक्षित वातावरणात, रुग्णांच्या घराच्या जवळ आणि किमान खर्चात उपलब्ध करण्याचा त्यांचा उद्देश आहे.

मुंबई, 3 मे 2026 : आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांशी संलग्न कॅन्सर उपचार अधिक सुलभरित्या उपलब्ध करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा दाखला देत, एम ओ सी कॅन्सर केयरने आज वाशी येथे आपल्या नवीन उपचार केंद्राचे उद्घाटन केले. या नव्या केंद्रामुळे कॅन्सर रुग्णांचा एकंदर प्रवास अधिक सोपा होण्यास मदत होणार आहे. या केंद्रासह, एम ओ सी भारतभर सध्या 27 कॅन्सर उपचार केंद्र चालवत आहे.

या नव्या केंद्राचे उद्घाटन महाराष्ट्राचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. गणेशजी नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नवी मुंबईच्या महापौर सौ. सुजाता सुरज पाटील, ठाण्याचे माजी खासदार श्री. संजीव नाईक, ऐरोलीचे माजी आमदार श्री. संदीप नाईक, नवी मुंबईचे उपमहापौर श्री. दशरथ भगत आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे सभागृह नेते श्री. सागर नाईक यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.


भारतामध्ये कॅन्सरचे प्रमाण सातत्याने वाढत असताना या उपचार केंद्राची उपलब्धता अत्यंत महत्त्वाची ठरते. विश्वासार्ह अहवालांच्या आकडेवारीनुसार 2026 मध्ये देशात 15 लाखांहून अधिक नवीन कॅन्सर रुग्णांची नोंद होण्याची शक्यता आहे. एकूण लोकसंख्येत वृद्धांचे वाढते प्रमाण, बदलती जीवनशैली, प्रदूषण आणि सुधारित निदानपद्धती यामुळे कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. महाराष्ट्र हे कॅन्सर रुग्णसंख्या जास्त असलेल्या राज्यांपैकी एक असून, त्यामुळे विकेंद्रित आणि विश्वासार्ह उपचार सुविधांची नितांत आवश्यकता आहे.

नवी मुंबईमध्ये स्थापन केलेल्या एम ओ सी च्या नवीन केंद्रावर अनुभवी कर्करोगतज्ञांकरवी योग्य सल्ला, केमोथेरपी तसेच टार्गेटेड थेरपी, इम्यूनोथेरपी, सेल्यूलर थेरपी व बोन मॅरो ट्रांसप्लांट सारखे आधुनिक उपचार उपलब्ध असतील. तसेच सपोर्टिव्ह आणि पॅलिएटिव्ह केअर, वेलनेस सपोर्ट आणि होम केअर सेवा देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, ज्यामुळे रुग्णांना त्यांच्या घराजवळच शिवाय वाजवी दरात संपूर्ण उपचार मिळू शकतील.

मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या वाशीचे महापौर श्री. संजीव गणेशजी नाईक यांनी MOC Cancer Care & Research Centre च्या उद्घाटनाचे कौतुक करताना सांगितले की, भारतात वाढत चाललेल्या कॅन्सरच्या घटनांमुळे सुलभ आणि परवडणाऱ्या उपचार सुविधांची गरज अत्यंत महत्त्वाची बनली आहे. बदलती जीवनशैली, पर्यावरणीय घटक आणि उशिरा होणारे निदान यामुळे कॅन्सरचा वाढता बोजा निर्माण झाला असून, दरवर्षी हजारो कुटुंबांवर त्याचा परिणाम होत आहे.

या प्रसंगी बोलताना ते म्हणाले, “वाशी येथे MOC Cancer Care & Research Centre चे उद्घाटन हे नवी मुंबईतील आरोग्य सेवांना बळकटी देणारे एक महत्त्वपूर्ण आणि योग्यवेळी उचललेले पाऊल आहे. प्रगत तंत्रज्ञानासह परवडणारी कॅन्सर उपचार सेवा देण्याच्या या केंद्राच्या वचनबद्धतेमुळे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबांवरील आर्थिक ताण कमी होण्यास मदत होईल, ही दिलासादायक बाब आहे. अशा उपक्रमांमुळे दर्जेदार ऑन्कोलॉजी सेवा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचेल आणि एकूणच रुग्णसेवेचा अनुभव अधिक चांगला होईल.”

या प्रसंगी बोलताना, डॉ. देवेंद्र पाल, एम ओ सी वाशी येथील वरिष्ठ कर्करोगतज्ञ म्हणाले,

“कॅन्सरचे वाढते प्रमाण लक्षात घेता, आधुनिक, सुरक्षित,  खिशाला परवडणारे उपचार रुग्णांच्या घराजवळ उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे आहे. एम  ओ सी कॅन्सर केयर- वाशीच्या माध्यमातून आम्ही हजारो कुटुंबांपर्यंत तज्ञांकरवी उपचार आणि सहानुभूतीपूर्ण सेवा पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत.”

याबाबत एम ओ सी कॅन्सर केयर येथील डॉ. कस्तुरी बरुहा- कॅन्सरतज्ञ म्हणाल्या की 

“कॅन्सरशी लढताना कोणत्याही रुग्णाला दूरचा प्रवास किंवा आर्थिक अडचणींमुळे उपचार लांबवावे लागू नयेत, हा आमचा मुख्य उद्देश आहे.”

उद्घाटनप्रसंगी एम  ओ सी चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनीष जोबनपुत्रा म्हणाले,

संस्थेने गेल्या काही वर्षांत उत्कृष्ठ उपचार सेवा आणि रुग्ण-केंद्रित दृष्टिकोन यांचा उत्तम समन्वय साधला आहे. विकेंद्रित कॅन्सर उपचारांची वाढती गरज लक्षात घेता, आम्ही आमचे नेटवर्क अशा पद्धतीने विस्तारत आहोत की ज्यामुळे अधिकाधिक रुग्णांना योग्य उपचार त्यांच्या घराजवळ सहज उपलब्ध होतील.”

वाशी येथील या नव्या केंद्रामुळे भारतातील विश्वासार्ह आणि सुलभ कॅन्सर केअर नेटवर्क उभारण्याच्या संस्थेच्या ध्येयाला अधिक बळ मिळणार आहे.

M|O|C Cancer Care & Research Centre बद्दल :

M|O|C Cancer Care & Research Centre हे भारतातील एक अग्रगण्य ऑन्कोलॉजी नेटवर्क असून, रुग्णांच्या परिसरातच परवडणाऱ्या दरात, वैज्ञानिक पुराव्यांवर आधारित आणि सर्वसमावेशक कॅन्सर उपचार देण्यास वचनबद्ध आहे. देशातील विविध शहरांमध्ये उपचार केन्द्र असलेल्या M|O|C चे उद्दिष्ट कॅन्सर रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना उपचारातील अडथळे दूर करण्यात मदत करणे आहे

Comments

Popular posts from this blog

Tamasha World HD premier on &pictures HD

Powerful, Soulful & Artistic #SMWMumbai

Oh My Merry Mantra