प्रबोधन-मार्मिक कथा स्पर्धा २०२६; यंदा दोन विभागांमध्ये चुरस
विनोदी कथांच्या विभागात प्रथम क्र. रु. १५,०००, द्वितीय क्र. रु. १०,००० आणि तृतीय क्र. रु. ७,५०० या रकमांची पारितोषिके देण्यात येणार असून लघुतम कथा विभागात प्रथम क्र. रु. ५,०००, द्वितीय क्र. रु. ३,५०० आणि तृतीय क्र. रु. २,००० अशी पारितोषिके देणार आहेत. विनोदी कथांच्या विभागात प्रत्येकी ५,००० रुपयांची दोन उत्तेजनार्थ पारितोषिकेही देण्यात येणार आहेत. लघुतम कथा विभागात प्रत्येकी १,००० रुपयांची दोन उत्तेजनार्थ पारितोषिके दिली जातील.
*स्पर्धेचे नियम*
विनोदी कथांच्या स्पर्धेसाठी लेखकांनी ३,५०० ते ४,००० या शब्दमर्यादेतील कथा पाठवायच्या आहेत.
लघुतम कथा ६०० ते ७०० या शब्दमर्यादेत बसणारी असावी.
दोन्ही स्पर्धा सर्व वयोगटांसाठी खुल्या असून कोणत्याही स्पर्धकाला एकाच विभागात कथा पाठवता येईल. दोन्ही विभागांत कथा पाठवल्यास दोन्ही बाद मानल्या जातील.
स्पर्धकांनी स्वरचित आणि स्वलिखित कथा युनिकोड फाँटमध्ये टाइप केलेल्या वर्ड फाइलच्या स्वरूपातच पाठवायची असून हस्तलिखित स्वीकारले जाणार नाही.
कथा मराठी भाषेत असावी, गरजेनुसार अन्य भाषांतील शब्दांचा तात्कालिक आणि उचित वापर चालेल.
कथा सद्भिरुचीहीन नसावी. ती अनुवादित अथवा पूर्वप्रकाशितही नसावी.
विभाग एकसाठी (विना परतावा) प्रवेश शुल्क २०० रुपये असून विभाग दोनसाठी ते १०० रुपये आहे.
कथांचे अर्ज १ ते २६ जून २०२६ या काळात स्वीकारले जातील. कथा पाठवण्याची अंतिम तारीख ७ जुलै २०२६ ही आहे.
पारितोषिकप्राप्त कथा मार्मिक दिवाळी अंकापासून त्यानंतरच्या अंकात क्रमश: प्रसिद्ध केल्या जातील.
सर्व कथांच्या वापराचे आणि पुन:प्रकाशनाचे सर्व हक्क 'प्रबोधन गोरेगाव' यांच्याकडे असतील.
कथा स्पीडपोस्टने किंवा prabhodhankridabhavan2014@gmail.com या ईमेलवर पाठवता येतील. प्रत्यक्ष कार्यालयात येऊन दिलेल्या कथा स्वीकारल्या जाणार नाहीत.
पोस्टाने कथा पाठवण्याचा पत्ता- प्रमुख कार्यवाह, प्रबोधन गोरेगाव, प्रबोधन क्रीडाभवन, प्रबोधन क्रीडाभवन मार्ग, सिद्धार्थ नगर, गोरेगाव पश्चिम मुंबई ४००१०४.
स्पर्धेसाठीचे प्रवेश अर्ज स्वतःच्या नाव सांगून ७५०६७६०६७६ या क्रमांकावरून मागवता येतील. यासाठी दुपारी तीन ते पाच या वेळेतच संपर्क साधावा.

Comments