मुंबईत दुसऱ्या आंतरराष्ट्रीय आर्बोरिकल्चर परिषदेचे आयोजन

“वाढती शहरे – हिरवी छत्रछाया” या संकल्पनेवर जागतिक तज्ज्ञांचे मंथन

मुंबई, फेब्रुवारी २०२६: वेगवान शहरीकरणाच्या युगात झाडे केवळ शोभेची वस्तू नसून हवामान बदलाशी लढा देण्यासाठी, सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी आणि शाश्वत विकासाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे या संदेशासह, दुसरी आंतरराष्ट्रीय वृक्षसंवर्धन परिषद (ATCA 2026) मुंबईत आयोजित केली जाईल.

अमेनिटी ट्री केअर असोसिएशन (ATCA) आणि नानाजी देशमुख प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, ही परिषद ७ आणि ८ मार्च, २०२६ रोजी हॉटेल सहारा स्टार, विले पार्ले (पूर्व), मुंबई येथे आयोजित केली जाईल.

या परिषदच्या आयोजना मागील  भूमिका स्पष्ट करताना, ATCA संचालक वैभव राजे म्हणाले, "वेगवान शहरीकरणामुळे वृक्ष संरक्षण आणि व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष झाले आहे. राज्य सरकार, महानगरपालिका आणि स्थानिक संस्थांनी वृक्षसंवर्धन मानके, तांत्रिक शिक्षण आणि शहरी वृक्ष कायद्यांच्या सुधारणेसाठी मजबूत धोरणे राबवणे आवश्यक आहे."

ATCA संचालक नकुल सावनी म्हणाले, "परिषदेची मुख्य थीम आहे 'वाढती शहरे. हिरवीगार छत्र.' गेल्या वर्षीच्या 'आमची झाडे. आमची शहरे. आमचे जीवन' या थीमनंतर, या वर्षीचा कार्यक्रम झाडांना शहरी विकासाला अडथळा म्हणून नव्हे तर हवामान पुरक, आरोग्य संरक्षक आणि महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा म्हणून अधोरेखित करण्याच्या दिशेने पुढील पाऊल आहे."

नानाजी देशमुख प्रतिष्ठानचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर्यन पांडेय म्हणाले, "ही भागीदारी भावी पिढ्यांसाठी हिरवीगार आणि निरोगी शहरे बांधण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे. मुंबई सारख्या गतिमान शहरात, विकास आणि पर्यावरण यांच्यातील समतोल खरोखरच साधला जाऊ शकतो आणि ही परिषद ते कसे शक्य आहे हे सप्रमाण सिद्ध करून दाखवेल."

मुख्य वक्ते आणि तज्ञ:

परिषदेत प्रसिद्ध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ञांचा समावेश असेल, यात खालील समावेश आहे:

कार्ल डाल्ला रिवा – संचालक, बोर्ड ऑफ आर्बोरिकल्चर, ऑस्ट्रेलिया

डॅन लाम्बे – मुख्य कार्यकारी अधिकारी, आर्बर डे फाउंडेशन, यूएसए

जेसिका सँडर्स – कार्यकारी संचालक, सॅक्रामेंटो ट्री फाउंडेशन, यूएसए

डॉ. संग्राम चव्हाण – वरिष्ठ शास्त्रज्ञ, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अबायोटिक स्ट्रेस मॅनेजमेंट, बारामती

डॉ. प्राची गुप्ता – प्राध्यापक, अझीम प्रेमजी विद्यापीठ, बेंगळुरू

व्योम भट्ट – सह-संस्थापक, श्रूम्ससभा

गॅबोर गोअर्ट्झ – मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक, ग्रीहिल

वास्तुविशारद शिल्पा गवाने – संस्थापक, ट्रीज ऑफ अहमदाबाद

आणि इतर अनेक प्रतिष्ठित जागतिक आणि भारतीय तज्ञ

परिषदेचे ठळक वैशिष्ट्ये:

शहरी वृक्ष व्यवस्थापनावर व्यावहारिक कार्यशाळा (६ मार्च – मर्यादित जागा, स्थळ लवकरच जाहीर केले जाईल)

बांधकाम प्रकल्पांदरम्यान वृक्ष संरक्षणावरील सत्रे

जागतिक मुख्य भाषणे आणि पॅनेल चर्चा

विद्यार्थी आणि संशोधकांसाठी पोस्टर स्पर्धा (३ पुरस्कार)

वृक्षसंवर्धनातील नवीन तंत्रज्ञान आणि संशोधनावरील सादरीकरणे

सर्व सहभागींना परिषद सहभाग प्रमाणपत्र

७ मार्च रोजी नेटवर्किंग डिनर

विशेष अतिथी :

मुख्य अतिथी – श्री. देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (७ मार्च)

वास्तुविशारद अॅलन अब्राहम, मुख्य वक्ता (७ मार्च)

दिया मिर्झा, मुख्य वक्ता (८ मार्च)

परिषद वृक्ष काळजी तज्ञ, उद्यानशास्त्रज्ञ, वृक्षविशारद, वास्तुविशारद, शहरी नियोजक, महानगरपालिका अधिकारी, संशोधक, विद्यार्थी आणि पर्यावरण उत्साही यांच्यासाठी खुली आहे.

अधिक माहिती आणि नोंदणीसाठी:

वेबसाइट: www.arbindia.com/events

ईमेल: info@arbindia.com

संपर्क: +९१ ९९२०४८६३९६


Comments

Popular posts from this blog

Tamasha World HD premier on &pictures HD

Here are 5 age defying love stories on Hindi television that proved that love has no age-bar.

Powerful, Soulful & Artistic #SMWMumbai