आमदार सुनील प्रभू यांनी भरतनाट्यममध्ये उज्वल कामगिरी करणाऱ्या इशान्वी इनामदारचा केला गौरव

 


मुंबई : नृत्यकलेत लहान वयातच उज्ज्वल कामगिरी करणारी मालाड पूर्व शिवधाम कॉम्प्लेक्स मधील त्रिमूर्ती सोसायटीत राहणाऱ्या इशान्वी इनामदारला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर मानाचे पुरस्कार मिळाले आहेत.भरतनाट्यम मधील तीच्या या अभिमानास्प कामगिरीची दखल घेत शिवसेना नेते,दिंडोशीचे आमदार,माजी महापौर सुनील प्रभू यांनी आज दुपारी इशान्वीच्या घरी जात तीचा शाल,पुष्पगुच्छ,नटराजची मूर्ती,खाऊ देवून तिचा गौरव केला.


यावेळी आ.प्रभू यांनी तिच्याशी आणि कुटुंबाशी संवाद साधत तिचे कौतुक केले.इशान्वीच्या  दुहेरी राष्ट्रीय व एक आंतरराष्ट्रीय कामगिरीमुळे तिच्या परिवारासह संपूर्ण नृत्यसंस्थेचा अभिमान वाढला.भविष्यात ती दिंडोशीचे नाव जागतिक पटलावर उज्वल करेल असा  विश्वास त्यांनी व्यक्त केला.


यावेळी स्थानिक शाखाप्रमुख सुभाष धानुका,युवा उपशाखा अधिकारी मंगेश चव्हाण,शिवसेनेचे माजी सचिव किरण वाडीवकर,इशान्वीची आई सोनाली,वडील संजय,आजी अलका जोशी,नृत्यसंस्थेचे तिचे शिक्षक  प्रीती रे व सुब्रतो रे,जेष्ठ पत्रकार मनोहर कुंभेजकर, संतोष नाझरे आदी मान्यवर  उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

Tamasha World HD premier on &pictures HD

Powerful, Soulful & Artistic #SMWMumbai

Here are 5 age defying love stories on Hindi television that proved that love has no age-bar.