Friday, May 10, 2024

जिथे इंद्रधनुष्याला पंख फुटतात: कशिश प्राइड फिल्म फेस्टिव्हल 2024 च्या आकर्षक फेस्टिव्हल ट्रेलर प्रसिद्ध, सल्लागार मंडळ आणि ज्यूरी सदस्यांचा संवादात भाग

 


कशिश प्राइड फिल्म फेस्टिव्हलच्या 15व्या आवृत्तीसाठी 8 मे 2024 रोजी मुंबई प्रेस क्लब येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये शहरभरातील प्रेस आणि मीडिया तसेच अतिथी आणि प्रतिष्ठित ज्युरी सदस्यांना आमंत्रित करण्यात आले होते.


या महोत्सवात काय पाहता येईल याची झलक पाहण्यासाठी अकांचा कारकी (नेपाळ) यांचा सनई, अबू सोहेल खानेकर (भारत) चा महरून, मोहसीन (इराण) द्वारे द ग्रेज आणि चॅड झेमेलचा डीएल गे हे चार लघुपट उपस्थितांसाठी प्रदर्शित करण्यात आले. हा महोत्सव 15 ते 19 मे दरम्यान नियोजित आहे आणि शहरातील प्रमुख ठिकाणी म्हणजे लिबर्टी सिनेमा (मरीन लाइन्स) अलायन्स फ्रँसेज आणि सिनेपोलिस (अंधेरी पश्चिम) येथे संपन्न होईल. 


कशिश’चे हेड ऑफ ऑपरेशन्स आरोन डिसोझा यांनी या महोत्सवाची सुरुवात केली आणि कशिश मुंबई इंटरनॅशनल क्वीर फिल्म फेस्टिव्हलचे कशिश प्राइड फिल्म फेस्टिव्हलमध्ये रुपांतर केले. फेस्टिव्हल डायरेक्टर श्रीधर रंगायन यांनी महोत्सवाच्या चिन्हाचे अनावरण केले - ज्यात तृतीयपंथी रंग तसेच BIPOC रंगांचा समावेश होता, जे विविधांगी लैंगिकतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या  रंगांच्या सर्वसमावेशकतेवर प्रकाश टाकतात. ही रचना इंद्रजीत नागी आणि सय्यद अली आरिफ यांनी साकारली होती. 


या महोत्सवाचे डायरेक्टर ऑफ प्रोग्रामिंग सागर गुप्ता यांनी जगभरातील सिनेमांची संख्या सांगितली आणि या वैविध्यपूर्ण कलाकृती पाहण्याचा अनुभवही मांडला. ज्यामुळे ते प्रभावित झाले. 

या पाच दिवसीय सिनेमहोत्सवात माहितीपट, कथात्मक चित्रपट अशा विविध श्रेणीतील 46 देशांतील 133 चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत. या वर्षीच्या महोत्सवात नवीन भर पडली आहे. आशिया पॅसिफिक क्वीर फिल्म फेस्टिव्हल अलायन्स पुरस्कार, ज्यामध्ये गागाओलालाच्या पाठिंब्याने 1000 अमेरिकन डॉलर्सचे रोख पारितोषिक आणि केशव सूरी फाऊंडेशनद्वारे मानसिक आरोग्यावरील सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला. कशिश 2024 मधील 10 सिनेमे यंदा ट्रान्सजेंडर फिल्ममेकरनी (ट्रान्स-मेन, ट्रान्सवुमन आणि नॉन-बायनरी फॉक्स) दिग्दर्शित केले आहेत.


कशिशच्या निमित्ताने सिनेमांच्या माध्यमातून क्वीर कम्युनिटीच्या सभोवतालच्या कलंकांवर प्रकाश टाकण्याचा जाईल आणि त्यांच्या कथा संवेदनशील दृष्टीकोनातून पाहिल्या जातील.


संध्याकाळी दुसऱ्या सत्रात, अरुणा राजे पाटील, डॉली ठाकूर आणि विवेक वासवानी यांचा समावेश असलेले सल्लागार मंडळ कशिश’च्या अनेक वर्षांच्या प्रवासाचा भाग असल्याच्या त्यांच्या अनुभवांबद्दल बोलण्यासाठी उपस्थित होते.


अरुणा राजे पुढे म्हणाल्या, "कशिश हे एक कुटुंब झाले आहे आणि मला वाटते की हा फेस्टिव्हल खूप आवश्यक होता". सिनेमा आणि जीवन एकमेकांशी जोडलेले आहेत आणि अशाप्रकारे प्रेक्षक पडद्यावरील पात्रांशी जोडले जाऊ शकतात असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. 

शबाना आझमी आणि नंदिता दास अभिनीत दीपा मेहताचा फायर प्रदर्शित झाला, तेव्हा डॉली ठाकूर यांनी सिनेमाची समीक्षा केल्याबद्दल पोलिसांनी त्यांची अडवणूक कशी केली याविषयीची एक छोटीशी कहाणी सांगितली. ज्याबद्दल आता त्यांना हसू येते. अभिनेता, निर्माता आणि पर्ल अकॅडमीचे प्राध्यापक विवेक वासवानी यांच्यासाठी, "हा केवळ एक फेस्टिव्हल नसून तो एक समाज आहे". त्यांच्या मते, श्रीधर रंगायन आणि सागर गुप्ता यांची दूरदृष्टी तसेच सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे कशीश हा मजबूत आवाजाचा समानार्थी शब्द असल्याचे सांगितले. 

पुढील विभागांमध्ये कथात्मक, माहितीपट आणि स्टुडंट शॉर्ट्स ज्यूरी यांचा समावेश होता. ज्यांनी चित्रपटांच्या विविध श्रेणींमध्ये कठीण निवड केल्यानंतर त्यांनी घेतलेले धडे आणि शिकवण सर्वांसमोर मांडली. 

किरण राव आणि सोनाली कुलकर्णी यांनी कथा किती प्रभावी असते आणि वेगवेगळ्या देशांमधून येऊनही सर्व सिनेमांमधून समान मुद्दे आणि संकल्पना कशा पसरल्या याबद्दल ज्युरी सदस्यांनी कथन केले. माहितीपटाचे ज्युरी सदस्य- कविता बहल आणि शिल्पी गुलाटी यांनी नमूद केले की या कलाकृती डोळ्यांत अंजन घालणाऱ्या असतात. तसेच कालांतराने क्वीर फिल्म्सकडे पाहण्याची दृष्टी सामान्य झाली आहे. ज्यामुळे ते अधिक सर्वसमावेशक आणि संवेदनशील बनले असल्याचे सांगितले.

सरतेशेवटी, अभिजीत मजूमदार आणि श्वेता बसू प्रसाद यांचा समावेश असलेल्या स्टुडंट शॉर्ट्स ज्युरीने यावेळी सादर कलाकृतींच्या तांत्रिक आणि परिपक्व कथाकथनामुळे आश्चर्याचा धक्का बसला आणि आपण रोमांचित झाल्याचे सांगितले.  प्रस्तुत कलाकृती या विद्यार्थ्यांनी तयार केल्या आहेत असं कुठेही जाणवले नसल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले. सिनेमा आणि सिने-निर्मात्यांशी असलेले संबंध तेव्हा अधिक दृढ झाले जेव्हा या सिनेमात समाजाच्या संदर्भात संबोधित केलेले मुख्य मानसिक प्रश्नांची ओळख त्यांना झाली, असे बारीक निरीक्षण मजूमदार यांनी यावेळी व्यक्त केले. 


ज्युरी सदस्य, माध्यमे यांच्याशी प्रश्न आणि संवाद साधून पत्रकार परिषद घेण्यात आली. कशिश प्राइड फिल्म फेस्टिव्हल 2024 च्या पत्रकार परिषदेचा समारोप सर्व ज्युरी सदस्य आणि महोत्सवाच्या टीमसह एक ग्रुप पिक्चर घेऊन करण्यात आला. 

No comments: