Friday, March 22, 2024

नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई अध्यक्ष सुनिल कुमरे ट्रस्टच्या महिला अध्यक्षा श्रद्धा शिंदे यांनी क्रॅकरजॅक ॲक्टिंग क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 30/3/24 रोजी दुपारी 2 ते 6 आदर्श नगर आरे कॉलनी गोरेगाव पूर्व येथे विनामूल्य व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा खास महिलांन साठी

 


विभागातील महिलांसाठी  नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई अध्यक्ष सुनिल कुमरे ट्रस्टच्या महिला अध्यक्षा श्रद्धा शिंदे यांनी क्रॅकरजॅक ॲक्टिंग क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 30/3/24 रोजी दुपारी 2 ते 6 आदर्श नगर आरे कॉलनी गोरेगाव पूर्व येथे विनामूल्य व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा खास महिलांन साठी किमयागार जोकर - मी घडणार अशी ह्या पर्सनालिटी प्रोग्रेस प्रोग्रॅम हा हसत खेळत व्यक्तिमत्व विकास  कार्यशाळा आणि परिसंवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दैनंदिन जीवनाच्या घाई गडबडीत अनेकदा महिलांचे स्वतः कडे लक्ष देण्याचे राहून जाते. अशा परिस्थिती स्वतः च्या व्यक्तीमत्वाचा विसर पडतो व 

व्यक्तीमत्वात काळानुरूप प्रगती न होता आयुष्याच्या राहाटगाड रहाटगडग्यात स्त्री 

फरफटत जाते. स्वतःच्या अस्तित्वाची योग्य जाणीव ठेवून स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात योग्य ती प्रगती साधण्याच्या हेतूने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे यात 

स्वतःला समजून घेणे,

,मानसिक आणि शारीरिक स्ट्रेस रीलीव,आवाजातील चढ उतार

बोलण्यातील सहजता आणि नेमकेपणा

*Body language*

आत्मविश्वास वाढवणे

तुमच्या personality बद्दल गमतीदार खेळ

अशा गोष्टींचा समावेश असेल.

या कार्यशाळा जयेश राजे- लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, कंटेंट रायटर , ट्रेनर

रुपाली वीरकर - जोशी- निवेदिका , सूत्रसंचालिका , मुलाखतकार.

हर्षदा दाते -  अभिनेत्री, एडिटर

भारती पाटील  - आयटा ट्रेनर, लेक्चरर, ग्रुमिंग कोच यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे. या कार्यशाळेचे मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभाग घ्यावा असे नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्ट  सचिव धर्मराज तोकला व महिला विभाग महासचिव अंकिता मांजरेकर यांनी कळविले आहे

No comments: