अरबोरीकल्चर' आता शासनाच्या धोरणाचा भाग बनणार :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अरबोरिकल्चर म्हणजे आता झाडांचा डॉक्टर आपल्याला उपलब्ध झाला आहे. आधुनिक तंत्रज्ञांच्या सहाय्याने वृक्ष संवर्धन वृक्ष पुनरुणोपण आणि नवीन वृक्षांची लागवड शास्त्रीय पद्धतीने करणे शक्य आहे. शहरांची स्कॅनिंग करून वृक्ष लागवडीसाठी डिजिटल ट्विन करण्याची तंत्रज्ञान उपलब्ध आहे. जास्त तंत्रज्ञानामुळे आता आपल्याला वृक्ष पडायला आला आहे किंवा तू पडू नये तसेच फांद्या धोकादायक आहेत किंवा नाही याची देखील पडताळणी करणे शक्य आहे. राज्य सरकारने पन्नास कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम मागील काळात हाती घेतला होता. Forest in India या प्रकाशनाने महाराष्ट्रात वनाचे क्षेत्र वाढल्याचे नमूद केले आहे. तेहतीस टक्के वनाच्छादित क्षेत्र निर्माण करण्यासाठी यापुढील काळात तीनशे कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. ही सर्व नवी लागवड आता आधुनिक तंत्रज्ञानाने कृषी हवामान परिस्थिती , जमिनीचे प्रकार आणि कोणत्या जातीचे वृक्ष लागवड करायचे? कोणते वृक्ष कोणत्या परिस्थितीमध्ये जगू शकतात ही शास्त्रीय माहिती घेऊन हा लागवडीचा कार्यक्रम पुढे नेण्यात येईल. त्यासाठी अरबोरिकल्चर क्षेत्रातले अरबोरिकल्चरीस्ट, स्टार्ट अप आणि तंत्रज्ञ यांना शासकीय प्रक्रियेत सहभागी करून घेतले जाईल. मँग्रोज तोडण्यासाठी उच्च न्यायालयाची परवानगी लागते. राज्य सरकारने विकास कामासाठी मँग्रोज तोडले असले तरी त्याची भरपाई म्हणून मँग्रोजचे पार्क तयार करण्यात आले आहे. विकासासोबतच हरित क्षेत्र  कमी होऊ न देता वाढवण्यावर सरकारचा भर आहे.

Comments

Popular posts from this blog

Tamasha World HD premier on &pictures HD

Powerful, Soulful & Artistic #SMWMumbai

Oh My Merry Mantra