आंतरराष्ट्रीय अर्बोरीकल्चर परिषदेतील शिफारसी केंद्र आणि राज्य सरकारला सादर करणार

मुंबई, २७ फेब्रुवारी २०२६: "शहरी वृक्षांचे शास्त्रीय पद्धतीने संवर्धन करण्याचे शास्त्र सांगणाऱ्या अर्बोरीकल्चर परिषदेतील विचार मंथनाच्या शिफारसी धोरण निश्चित करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारला पाठवण्यात येणार असल्याची माहिती नानाजी देशमुख प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पांडे आणि ATCA चे संचालक वैभव राजे यांनी दिली."

मुंबईतील हॉटेल सहारा स्टार, विले पार्ले (पूर्व) येथे दिनांक ६ मार्च ते ८ मार्च २०२६ दरम्यान दुसरी आंतरराष्ट्रीय अर्बोरीकल्चर (वृक्ष संवर्धन) परिषद आयोजित करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शहर नियोजनातील मान्यवर आणि जगभरातील अर्बोरीकल्चर तज्ञ या परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत.

वृक्ष संवर्धन हा काळाची गरज

या परिषदेची पत्रकार परिषदेत माहिती देताना नानाजी देशमुख प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पांडे म्हणाले, "शहरांमध्ये वृक्ष लागवडी बरोबरच अस्तित्वात असलेली झाडे संवर्धित करणे काळाची गरज आहे. शहरी विकासाला हिरवी झालर देताना अर्बोरीकल्चरचे शास्त्रीय तंत्रज्ञान या परिषदेच्या माध्यमातून धोरणापर्यंत पोहोचणार आहे."

राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या परिषदेचे उद्घाटन करणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते परिषदेचा समारोप होणार आहे, असे पांडे यांनी स्पष्ट केले.

या पत्रकार परिषदेत नानाजी देशमुख प्रतिष्ठानचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर्यन पांडे आणि ATCA चे संचालक नकुल सावनी देखील उपस्थित होते.

जागतिक तज्ञांची मुंबईत भेट

अर्बोरीकल्चर क्षेत्रामध्ये जगभरात काम करणारे मान्यवर तज्ञ या परिषदेच्या निमित्ताने मुंबईत येणार असून या परिषदेमध्ये राज्यातील आणि देशातील महानगरपालिका, विमानतळ विकासक, रियल इस्टेट क्षेत्रातील उद्योजक देखील सहभागी होणार आहेत.

परिषदेत सहभागी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय तज्ञांमध्ये कार्ल डल्ला रिवा (संचालक, बोर्ड ऑफ आर्बोरीकल्चर, ऑस्ट्रेलिया), डॅन लॅम्बे (मुख्य कार्यकारी अधिकारी, आर्बर डे फाउंडेशन, यूएसए), जेसिका सँडर्स (कार्यकारी संचालक, सॅक्रामेंटो ट्री फाउंडेशन, यूएसए), तर राष्ट्रीय तज्ञांमध्ये डॉ. संग्राम चव्हाण (वरिष्ठ शास्त्रज्ञ, राष्ट्रीय अजैविक तणाव व्यवस्थापन संस्था, बारामती), डॉ. प्राची गुप्ता (प्राध्यापक, अझीम प्रेमजी विद्यापीठ, बेंगलुरु), व्योम भट्ट (सह-संस्थापक, श्रूमसभा), वास्तुविशारद शिल्पा गवाणे (संस्थापक, ट्रीज ऑफ अहमदाबाद) यांचा समावेश आहे.

अर्बोरीकल्चर इम्पॅक्ट सर्वेक्षणाची गरज

ATCA चे संचालक वैभव राजे म्हणाले, "अर्बोरीकल्चर म्हणजे वृक्ष लागवड हा मर्यादित अर्थ आहे. विकास प्रकल्प पुढे नेत असताना आपल्याकडे पर्यावरण आणि सामाजिक सर्वेक्षण होते. परंतु अस्तित्वात असलेल्या वृक्षांच्या संवर्धनासाठी अर्बोरीकल्चर इम्पॅक्ट सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. पाश्चात्त्य देशांमध्ये हे सर्वेक्षण झाल्याशिवाय कोणताच प्रकल्प पुढे जात नाही. आपल्या शहरांमधील विकास हरित करण्यासाठी धोरणांच्या पातळीवर मोठे बदल घडवून आणणे लागणार आहेत."

तीन दिवसीय परिषदेचा कार्यक्रम

६ मार्च २०२६ (पहिला दिवस) - पूर्व-परिषद कार्यशाळा:

जागतिक तज्ञांच्या उपस्थितीत सहा मार्च रोजी दोन महत्त्वाच्या कार्यशाळा होणार आहेत:

बांधकाम प्रकल्पांमधील वृक्ष संवर्धन (Construction and Tree Preservation Workshop)

आपल्या भोवती वृक्ष (Trees Around Us Workshop)

तसेच एक अर्बन ट्री फाउंडेशनची राउंड टेबल कॉन्फरन्स पार पडेल.

(मर्यादित जागा - आगाऊ नोंदणी आवश्यक)

७ मार्च २०२६ (दुसरा दिवस) - परिषदेचे उद्घाटन:

मुख्य अर्बोरीकल्चर परिषदेचे उद्घाटन राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या ७ मार्च २०२६ रोजी करतील. पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमांसोबत प्रख्यात वास्तुविशारद आणि शहरी नियोजनकार अॅलन अब्राहम यांचे बीज भाषण होणार आहे.

उद्घाटन समारंभ - पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते

मुख्य अतिथी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्य भाषण - वास्तुविशारद अॅलन अब्राहम (प्रख्यात शहरी नियोजनकार)

तांत्रिक सत्रे - जागतिक आणि राष्ट्रीय तज्ञांचे सादरीकरण

पॅनेल चर्चा - "Growing Cities - Greener Canopies"

संध्याकाळी नेटवर्किंग डिनर

८ मार्च २०२६ (तिसरा दिवस) - समारोप:

परिषदेचा समारोप आठ मार्च २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडेल.

संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण दूत दिया मिर्झा यांचे देखील या परिषदेमध्ये बीज भाषण होणार आहे.

मुख्य भाषण - दिया मिर्झा (संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण दूत आणि अभिनेत्री)

पोस्टर सादरीकरण - विद्यार्थी आणि संशोधकांकडून

पुरस्कार वितरण - उत्कृष्ट पोस्टर सादरीकरणासाठी (शीर्ष ३ पुरस्कार)

समारोप समारंभ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते

सहभाग प्रमाणपत्र वितरण

हवामान बदल आणि कार्बन उत्सर्जन नियंत्रणासाठी वृक्षांची भूमिका

आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये आयोजकांच्या वतीने हवामान बदलाचे संकट तसेच कार्बन उत्सर्जन नियंत्रित करण्यासाठी वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन हे तातडीचे विषय असल्याचे प्रतिपादित केले.

या परिषदेच्या माध्यमातून शहरी नियोजनाला हिरवी झालर प्राप्त होईल आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने राज्याची आणि देशाची वाटचाल होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

नोंदणी आणि माहिती:

वेबसाइट: www.arbindia.com/events

ई-मेल: info@arbindia.com

संपर्क: +91 9920486396

आयोजक:

अमेनिटी ट्री केअर असोसिएशन (ATCA)

नानाजी देशमुख प्रतिष्ठान

मीडिया संपर्क:

वैभव राजे - संचालक, ATCA

नकुल सावनी - संचालक, ATCA

संजय पांडे - अध्यक्ष, नानाजी देशमुख प्रतिष्ठान

आर्यन पांडे - मुख्य कार्यकारी अधिकारी, नानाजी देशमुख प्रतिष्ठान

संपर्क: +91 9920486396

"शहरे वाढवूया, छत्र हरवूया!"

फोटो क्रमांक १: आंतरराष्ट्रीय अर्बोरीकल्चर परिषदेच्या पत्रकार परिषदेत उपस्थित (डावीकडून उजवीकडे) ATCA चे संचालक नकुल सावनी, ATCA चे संचालक वैभव राजे, नानाजी देशमुख प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पांडे आणि नानाजी देशमुख प्रतिष्ठानचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर्यन पांडे.

फोटो क्रमांक २: आंतरराष्ट्रीय अर्बोरीकल्चर परिषदेच्या पत्रकार परिषदेत उपस्थित (डावीकडून उजवीकडे) ATCA चे संचालक नकुल सावनी, ATCA चे संचालक वैभव राजे, नानाजी देशमुख प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पांडे आणि नानाजी देशमुख प्रतिष्ठानचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर्यन पांडे.

फोटो क्रमांक ३: आंतरराष्ट्रीय अर्बोरीकल्चर परिषदेच्या पत्रकार परिषदेत उपस्थित (डावीकडून उजवीकडे) ATCA चे संचालक नकुल सावनी, ATCA चे संचालक वैभव राजे, नानाजी देशमुख प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पांडे आणि नानाजी देशमुख प्रतिष्ठानचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर्यन पांडे.

Comments

Popular posts from this blog

Tamasha World HD premier on &pictures HD

Here are 5 age defying love stories on Hindi television that proved that love has no age-bar.

Powerful, Soulful & Artistic #SMWMumbai