बोल बोल राणी, इता इता आणी”मध्ये वर्षा राणेंची प्रभावी भूमिका बालदिनानिमित्त खास स्क्रीनिंगचं आयोजन
मुंबई : बालदिनाच्या पूर्वसंध्येला ऑल प्ले प्रोडक्शन्स
तर्फे त्यांच्या पहिल्या शॉर्ट फिल्मची — “बोल बोल राणी, इता इता आणी” — खास स्क्रीनिंग अथर्व ऑडिटोरियममध्ये आयोजित करण्यात आली. लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय या तिन्ही भूमिकांमध्ये वर्षा राणेंनी आपल्या विद्यार्थ्यांसह ही फिल्म साकारत एक आगळी कलाकृती सादर केली आहे.
नाट्यक्षेत्रात दीर्घ अनुभव असलेल्या या टीमने या वेळी सिनेमा हा नवा माध्यम म्हणून स्वीकारला. मुलांच्या कल्पक विचारांवर आधारित असलेल्या या चित्रपटाने भावनिक आणि रोचक मांडणीमुळे पाहणाऱ्यांना गुंतवून ठेवले. वर्षा राणेंची स्क्रीनवरील उपस्थिती, अभिनय आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना दिलेलं मार्गदर्शन विशेषत्वाने उल्लेखनीय ठरल आहे.
या स्क्रीनिंगला मराठी अभिनेत्री आणि टीव्ही प्रस्तोत्या अमृता ए. राव, सुनील राणे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी चित्रपटाची आणि वर्षा राणेंच्या योगदानाची प्रशंसा करत, ही कलाकृती मुलांच्या कलेला दिलेली सकारात्मक दिशा असल्याचं नमूद केलं.
कार्यक्रमादरम्यान वर्षा राणे म्हणाल्या की,
“या फिल्मद्वारे आम्ही मुलांना त्यांची कल्पनाशक्ती मुक्तपणे व्यक्त करण्यासाठी एक व्यासपीठ द्यायचं होतं. त्यांच्या या प्रवासातून त्यांनी स्वतःला नव्या रूपात ओळखलं आहे.”
या सोहळ्याने ऑल प्ले प्रोडक्शन्स
आणि मालाड पश्चिम येथील अथर्व युनिव्हर्सिटी यांच्यातील सर्जनशील सहकार्याला आणखी बळकटी मिळाली. या सहकार्यामुळे फिल्मला आवश्यक आकार आणि गुणवत्ता मिळाली.
फिल्मच्या विशेष दाखल्याने बालदिनाचा आनंद दुणावला, ज्यात मुलांची सर्जनशीलता, त्यांचे स्वप्न आणि त्यांची कल्पनाशक्ती या सगळ्यांना केंद्रस्थानी ठेवण्यात आलं. स्क्रीनिंगनंतर उपस्थित प्रेक्षकांनी मुलांच्या या कलात्मक प्रयत्नाचं मनापासून कौतुक केलं.

Comments