४६ व्या प्रबोधन गोरेगावच्या आंतर शालेय क्रीडा महोत्सवाला दिमाखात प्रारंभ

मुंबई : आज ४६  व्या प्रबोधन आंतर शालेय क्रीडा महोत्सवाला काल गोरेगावात दिमाखात प्रारंभ झाला.शिवसेना नेते व प्रबोधन गोरेगावचे संस्थापक  सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत प्रमुख पाहुणे प्रबोधन गोरेगावचे उपाध्यक्ष आणि सुप्रिया लाईफ सायन्सचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सतीश वाघ यांच्या हस्ते या क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ बॅन्ड मार्च पास संचलनाने संपन्न झाला.‌संचलन करणा-या स्पर्धकांनी प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. 


प्रबोधन गोरेगाव क्रीडानगरीत क्रीडा ज्योत फिरवून औपचारिकरित्या महोत्सवाची ज्योत प्रज्वलीत केली. यावेळी खेळातील नियम व अटींचे प्रामाणिकपणे पालन करूया अशी प्रतिज्ञा सर्व खेळाडूंतर्फे घेतली.


या क्रीडा स्पर्धेत ३०० पेक्षा जास्त शाळा आणि ४ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी आपले क्रीडा नैपुण्य विविध खेळांच्या माध्यमातून दाखवणार आहे.

 

या कार्यक्रमाला प्रबोधन गोरेगावचे अध्यक्ष नितीन शिंदे, कार्याध्यक्ष कैलास शिंदे,प्रमुख कार्यवाह गोविंद गावडे,खजिनदार रमेश इस्वलकर आणि प्रबोधन कार्यकारिणी सदस्य  उपस्थित होते.तर यावेळी ४५ वर्ष निवेदन करणारे वायरन वाझ यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

Tamasha World HD premier on &pictures HD

Powerful, Soulful & Artistic #SMWMumbai

Oh My Merry Mantra