Wednesday, May 8, 2024

हॉलिवूडची रहस्यमय ‘भुताटकी’ भेटायला येत आहे अल्ट्रा झकास ओटीटीवर!रसिक प्रेक्षकांचं चित्त वेधून घेणारा हॉलीवूडचा सुपरहिट रहस्यमय चित्रपट ‘डोन्ट लुक अवे’ आता ‘भुताटकी’ या शीर्षकात मराठीमध्ये पहायला मिळणार आहे. चित्रपट १० मे २०२४ रोजी ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना मनोरंजनात खोल गुंतवून ठेवणार आहे.


मॅकविन नावाच्या एका भयानक पुतळ्याकडे जो कोणी पाहतो त्याचा मृत्यू होतो. फ्रँकी नावाची एक तरुण मुलगी तिच्या मित्रांना या पुतळ्यापासून वाचवण्यासाठी पुतळ्यामागच्या शक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न करते. फ्रँकीच्या प्रयत्नांना यश येते की नाही, हे चित्रपटात कळणार आहे.


“चित्रपटाच्या दिग्दर्शकाने पूर्ण रहस्याने भरलेला चित्रपट देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आहे. रसिकांना जर असेच रहस्यमय चित्रपट पहायला आवडत असतील तर ‘भुताटकी' चित्रपट अगदी योग्य चित्रपट ठरणार आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

नवनवीन चित्रपट पाहण्यासाठी :- https://www.ultrajhakaas.com/marathi-movies


प्रसिद्धी जनसंपर्क प्रमुख: राम कोंडीलकर (राम पब्लिसिटी, मुंबई)

संपर्क: मो.,WhatsApp 9821498658

ईमेल: ramkondilkar.pr@gmail.com

No comments: