वृक्ष संवर्धनातून सामाजिक न्यायाची अपेक्षा: दिया मिर्झा
मुंबई,8 मार्च 2026: " अरबोरिकल्चरच्या माध्यमातून वृक्षांचे शास्त्रोक्त संवर्धन शक्य आहे. वातावरण मधल्या महा संकटातून वाचवण्यासाठी वृक्षांशिवाय पर्याय नाही, शहरांच्या शाश्वत हरित विकासातून सामाजिक न्यायाचा हक्क प्रस्थापित करावा असे आवाहन संयुक्त राष्ट्र संघाच्या दूत आणि सिने अभिनेत्री दिया मिर्झा यांनी केले.
ग्रोइंग सिटीज, ग्रीनर कॅनोपीज' या संकल्पनेवर आधारित दुसरी आंतरराष्ट्रीय अरबोरिकल्चर परिषदेच्या ( वृक्षवर्धन २०२६) दुसऱ्या दिवशी— मुंबईतील हॉटेल सहारा येथे दिया मिर्झा बोलत होत्या. अमेनिटी ट्री केअर असोसिएशन (ATCA) आणि नानाजी देशमुख प्रतिष्ठान यांनी संयुक्तपणे परिषदेच्या आयोजन केले आहे.
यावेळी ATCA संघटनेचे संचालक वैभव राजे, संचालक नकुल सावनी, नानाजी देशमुख प्रतिष्ठानचे CEO आर्यन पांडे आणि नानाजी देशमुख प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पांडे उपस्थित होते.
अरबोरिकल्चर परिषदेच्या आयोजनाबद्दल आनंद व्यक्त करत दिया मिर्झा यांनी सुरुवातीलाच सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
त्या म्हणाल्या,' वैभव राजे हे देशातले एकमेव सर्टिफाइड अरबोरीकल्चरिस्ट आहेत त्यांच्याकडून मला नेहमीच नवनवे विषय शिकायला मिळाले आहेत. मी लहान असताना हैदराबाद मध्ये निसर्गासोबत वाढली. हिरवाई विरहित होणाऱ्या आधुनिक नागरिक विकासामध्ये निसर्गाचा अभाव आहे. त्यामुळेच जपान सारख्या देशांमध्ये निराशातील लोकांवर उपचार करण्यासाठी जंगलात जाऊन निसर्गाचा अनुभव घेण्याची उपचार केले जातात."
निसर्ग सोबत स्वतःचा अनुभव कथन करताना दिया मिर्झा म्हणाल्या," माझा मुलगा ज्या शाळेत जातो ती शाळा अपार्टमेंट मध्ये आहे तिथे निसर्गाचा लवलेश नाही. परंतु माझ्या घराच्या बाल्कनी मध्ये छोटे जंगल तयार झाले आहे त्यातून नवी पिढी निसर्ग समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे."
आंतरराष्ट्रीय पातळीवर युद्ध सुरू असताना आपल्याच परिसरातील 45 हजार मँग्रोजची कत्तल मनाला दुःख देते. आपण कधी झाडांशी बोलण्याचा प्रयत्न करत नाही.परंतु वृक्ष संवाद साधतात.
हवामान बदलाच्या संकटावर भाष्य करताना दिया मिर्झा यांनी वाढते तापमान, हिट स्ट्रेस आणि अवेळी येणारे पर्जन्य हे बदलत्या नैसर्गिक समतोलाचे उदाहरण असल्याचे सांगितले. हिट आयलँड इफेक्ट मुळे शहरातील नागरिकांना साडेचार तास हक्काची झोप येणे मुश्किल झाले आहे. मानवी आरोग्यासाठी झोप महत्त्वाची आहे. तुमची प्रगती शांती आणि समाधान हे निसर्गाच्या संतुलनातूनच मिळेल आणि तोच खरा सामाजिक न्याय असेल असे दिया मिर्झा यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
निसर्ग विरोधी असणारे लोक कोण आहेत? असा प्रश्न उपस्थित करत या लोकांचा निसर्गाशी कनेक्ट नाही. यांना निसर्गाची किंमत ठाऊक नाही. थोड्या फायद्यासाठी हे लोभी लोक निसर्गाचे नुकसान करत आहेत.
एक कलाकारांनी नागरिक प्रश्नांवरती जागरूक नागरिक म्हणून अर्बोरिकल्चरच्या माध्यमातून वृक्ष संवर्धनाचे काम करणारे वैभव राजे यांना माझा संपूर्ण पाठिंबा असून या चळवळीतून आपण स्वच्छ सुंदर आणि संतुलित विकास पूरक अशी हरित शहरे आणि नैसर्गिक जगण्याचा मार्ग तयार करू असे दिया मिर्झा यांनी शेवटी सांगितले.
यावेळी अरबोरिकल्चर परिषदेच्या अनुषंगाने आयोजित प्रदर्शनाला देखील त्यांनी भेट दिली प्रदर्शकांशी संवाद साधला. तसेच अरबोरी कल्चर परिषदेमध्ये सुरू असलेल्या सत्राला देखील उपस्थिती दर्शवली.
1.ग्रोइंग सिटीज, ग्रीनर कॅनोपीज' या संकल्पनेवर आधारित दुसरी आंतरराष्ट्रीय अरबोरिकल्चर परिषद — वृक्षवर्धन २०२६ — अमेनिटी ट्री केअर असोसिएशन (ATCA) आणि नानाजी देशमुख प्रतिष्ठान यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या परिषदेत
संयुक्त राष्ट्राच्या दूत आणि सिनेअभिनेत्री दिया मिर्झा उपस्थित होत्या. यावेळी (उजवीकडून)
ATCA संचालक वैभव राजे,नानाजी देशमुख प्रतिष्ठानचे CEO आर्यन पांडे.
2. अरबोरिकल्चर परिषदेच्या निमित्ताने आयोजित प्रदर्शनाला भेट देताना अभिनेत्री दिया मिर्झा

Comments