प्रबोधन गोरेगावचा ५४ वा वर्धापन दिन मराठी-हिंदी गीतांची रंगणार सुरेल मैफल

मुंबई : प्रबोधन गोरेगाव या सामाजिक-सांस्कृतिक-क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेल्या या संस्थेच्या ५४ व्या वर्धापन दिनानिमित्त गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला बुधवार,दि. १८ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता गोरेगाव (पश्चिम) येथील प्रबोधन क्रीडा भवन, सिद्धार्थ नगर येथे मराठी व हिंदी गाण्यांची सुरम्य संध्याकाळ रंगणार आहे. संगीतप्रेमींसाठी खास आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात दर्जेदार संगीताचा आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे.


संस्थेचे संस्थापक तथा शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रबोधन गोरेगाव गेली अनेक वर्षे सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात विविध उपक्रम राबवत असून परिसरातील नागरिकांमध्ये सांस्कृतिक जाणीवा वृद्धिंगत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे.


या विशेष कार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्कार मानकरी व लोकप्रिय गायक राहुल देशपांडे तसेच राज्य पुरस्कार मानकरी व सुप्रसिद्ध गायिका प्रियांका बर्वे यांच्या आवाजातील मराठी व हिंदी गीतांची रंगतदार मैफल रंगणार आहे. दोन्ही कलाकारांच्या सुरेल गायनामुळे रसिकांना अविस्मरणीय संगीतसंध्येचा अनुभव मिळणार असल्याने संगीतप्रेमींमध्ये या कार्यक्रमाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.


गुढीपाडव्याच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण होणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून प्रवेश विनामूल्य आहे. अधिकाधिक नागरिकांनी उपस्थित राहून या सुरेल संध्याकाळीचा आनंद घ्यावा, असे आवाहन प्रबोधन गोरेगावचे प्रमुख कार्यवाह गोविंद गावडे यांनी केले आहे.

Comments

Jonas said…
That sounds like a wonderful way to celebrate the 54th anniversary of Prabodhan Goregaon! A concert blending Marathi and Hindi songs must be an amazing experience for everyone attending. Just like this celebration brings people together through music, platforms like tiger exchange bring cricket and betting enthusiasts together, offering a smooth and engaging experience with live odds, multiple betting markets, and secure access for users. It’s all about creating memorable and interactive experiences, whether in music or online cricket betting.

Popular posts from this blog

Tamasha World HD premier on &pictures HD

Powerful, Soulful & Artistic #SMWMumbai

Oh My Merry Mantra