शिवधाम संकुलातील अंतर्गत नागरी समस्यांचा आमदार सुनील प्रभू यांनी घेतला आढावा
मुंबई-दिंडोशी,मालाड (पूर्व), प्रभाग क्रमांक ४४ येथील शिवधाम संकुलातील विविध अंतर्गत नागरिक समस्यांचा शिवसेना विभागप्रमुख,स्थानिक आमदार सुनील प्रभू यांनी काल दुपारी आढावा घेत मलनिस्सारण वाहिनी व रस्त्याच्या काँक्रिटीकरण आणि नागरी समस्यांच्या कामांची पाहणी केली. नागरिकांच्या अनेक समस्या जाणून घेत त्यामार्गी लावण्याचा प्रयत्न केला.
शिवधाम संकुलातील रस्ते खराब असून रस्त्यावरील असणारे दिवे बंद अवस्थेत आहे,तर नागरिकांना भटक्या कुत्र्यांचा त्रास आहे,फायरब्रिगेडच्या मागील
कबूतर खाना बंद करा अश्या समस्या नागरिकांनी केल्या.त्याकडे आमदार सुनील प्रभू यांनी पालिका प्रशासनाचे लक्ष वेधत या समस्या सोडवण्याच्या सूचना दिल्या.
तसेच येथील अभिषेक सोसायटी ते वृंदावन-प्रयाग सोसायटी पर्यतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण करा,येथील रस्त्यावरील स्ट्रीट लाईट बंद असून रस्त्याचे काम पूर्ण होई पर्यत दोन मोठे हॅलॉजन लावा अशा सूचना त्यांनी पालिकेचे कार्यकारी अभियंता रोहन खरात व सेंट्रल रोड चे सब इंजिनियर चेतन सावंत यांना दिले.
तर ओबेरॉय मॉल समोरील लावण्यात आलेले बॅरिकेट्स मुळे नागरिकांना जीव मुठीत ठेवत रस्ता क्रॉस करावा लागतो. त्यामुळे येथील बॅरिकेट्स
त्वरित काढण्यात यावेत अश्या सूचना येथील नागरिकांनी केल्या त्यावर देखील मार्ग काढत तात्काळ बॅरिकेट्स काढून नागरिकांना सुरळीत रस्ता क्रॉस करण्यासाठी सहकार्य करा असे आदेश त्यांनी संबधितांना दिले.
संकुलातील म्हाडा अंतर्गत बांधलेल्या म्हाडाच्या उद्यानाच्या दुरावस्थेबाबत नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले. याबाबत आमदार सुनील प्रभू यांनी आपण या संदर्भात या म्हाडाशी पाठपुरावा करून लवकरात लवकर उद्यानाचे नूतनीकरण करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी स्थानिक शिवसेनेचे शाखा क्र. ४४ चे शाखाप्रमुख सुभाष धनुका, उपशाखाप्रमुख शैलेश जाधव, अशोक दैने. युवासेना उपशाखाधिकारी आर्यन जाधव, मंगेश चव्हाण. शिवधाम सेवा मंडळाचे अध्यक्ष रविंद बोभाटे,सचिव जितेंद्र पराडकर,जेष्ठ पत्रकार मनोहर कुंभेजकर,
तसेच येथील विविध गृहनिर्माण सोसायट्यांचे पदाधिकारी संतोष नाझरे,रामचंद्र म्हापणकर,अरुण वाघ कुंदन गोस्वामी, सुरेश गोसवी, अनंत ठाकरे, सुनील मोरे,प्रथमेश वेंगुर्लेकर आणि येथील नागरिक उपस्थित होते.

Comments