नूतनीकरण केलेल्या टँक रोड पोस्ट ऑफिसचे पुनःउद्घाटन - 400033
मुंबई, 04 नोव्हेंबर 2025 — पोस्ट विभाग, मुंबई पूर्व विभाग, यांना हे जाहीर करताना आनंद होत आहे की मुंबईच्या मध्यवर्ती भागातील ऐतिहासिक टँक रोड पोस्ट ऑफिसचे नूतनीकरणानंतर पुनःउद्घाटन करण्यात आले आहे.
या पोस्ट ऑफिसचे उद्घाटन दि. 04 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11:00 वाजता श्री अमिताभ सिंग (IPOS), मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र परिमंडळ यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी सुश्री सिमरन कौर (संचालक, टपाल सेवा - मुख्यालय), सुश्री कायया अरोरा (संचालक, टपाल सेवा - मुंबई विभाग), आणि सुश्री आस्था जैन (वरिष्ठ अधीक्षक, टपाल कार्यालये - मुंबई पूर्व विभाग) तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
या नूतनीकरणाचा उद्देश ग्राहकांना अधिक चांगला अनुभव देणे आहे. आधुनिक पायाभूत सुविधा, उन्नत डिजिटल सुविधा आणि नागरिक-केंद्रित वातावरण यांद्वारे इंडिया पोस्टची नवोन्मेष, कार्यक्षमता आणि सार्वजनिक सोयीसाठी असलेली सातत्यपूर्ण बांधिलकी अधोरेखित करण्यात आली आहे.
इंडिया पोस्टचे ब्रीदवाक्य: “डाक सेवा – जन सेवा”
प्रकाशनासाठी जारी.
वरिष्ठ अधीक्षक, टपाल कार्यालय,
मुंबई पूर्व विभाग
तिसरा मजला, दादर मुख्य टपाल भवन
मुंबई - 400014
०२२-२४११०५७७
Comments