विप्रोने ‘इनोव्हेशन फॉर ह्युमन स्पेसेस’ या संकल्पनेअंतर्गत नवीन कार्यस्थळांची मांडणी केली


IoT तंत्रज्ञानावर आधारित हवामान नियंत्रण (एअर क्वालिटी) उपाय, आधुनिक प्रकाशयोजना आणि आरामदायी बसण्याच्या सुविधा सादर केल्या

मुंबई, मंगळवार, २८ ऑक्टोबर २०२५: विप्रो कंझ्युमर केअर अँड लायटिंगचा भाग असलेल्या विप्रो कमर्शियल अँड इन्स्टिट्यूशनल बिझनेस (CIB) यांनी आज आपली नवी दिशा जाहीर केली – ‘इनोव्हेशन फॉर ह्युमन स्पेसेस’, ज्यामध्ये लोकांना प्रगती करता येईल अशी टिकाऊ कार्यस्थळे एकत्र तयार करण्याच्या त्यांच्या ध्येयावर भर दिला आहे.

या ध्येयाचा भाग म्हणून, विप्रोने आज आपले अत्याधुनिक एअर क्वालिटी मॉनिटरिंग सोल्यूशन ‘iSense Air’ सादर केले आहे, जे प्रत्यक्ष वेळेतील कामाच्या ठिकाणाची हवेची गुणवत्ता माहिती आणि उपयोगी डेटा प्रदान करते. यासोबतच, कंपनीने लायटिंग आणि सीटिंगसाठी इनडोअर व आऊटडोअर स्पेसेससाठी पुढील पिढीतील उत्पादने आणि उपाय – जसे inSync, OnAir आणि इतर – देखील प्रदर्शित केले आहेत. ही नवीन उत्पादने आरोग्य व कल्याण, उत्पादकता आणि पर्यावरणीय जबाबदारी या तीन प्रमुख आधारस्तंभांवर आधारित आहेत.

ही नवकल्पना भविष्यातील गरजांसाठी तयार कार्यस्थळांवर लक्ष केंद्रित करते — जिथे IoT-सक्षम लायटिंग सिस्टिम्स मानवी जैविक घड्याळाशी (circadian rhythms) सुसंगत आहेत, इनडोअर एअर क्वालिटी मॉनिटरिंग व आरामदायी आणि उत्पादकतेस प्रोत्साहन देणारी एर्गोनॉमिक सीटिंग व्यवस्था आहे. तसेच “डार्क स्काय” प्रमाणित लायटिंगद्वारे शहरी परिसरातील प्रकाशप्रदूषण कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. या सर्व उपायांमधून आरोग्य सुधारणा, उत्पादकता वाढ आणि टिकाऊपणाला चालना कशी मिळू शकते, हे दाखवले आहे. 


“आपण ज्या जागांमध्ये काम करतो त्या आपल्या भावना, विचार करण्याची पद्धत आणि एकमेकांशी संवाद यावर प्रभाव टाकतात — आणि त्यामुळेच आपल्या आरोग्य, सर्जनशीलता, उत्पादकता आणि आपलेपणाच्या भावनांवर परिणाम होतो. आपण आपल्या आयुष्याचा जवळपास अर्धा भाग कार्यस्थळांवर घालवतो, त्यामुळे त्या जागांची रचना कशी आहे हे अत्यंत महत्त्वाचे ठरते. ‘इनोव्हेशन फॉर ह्युमन स्पेसेस’ ही संकल्पना म्हणजे मानवकल्याण वाढवणारे वातावरण तयार करणे आहे. जेव्हा आपण चांगल्या जागा निर्माण करतो, तेव्हा व्यक्ती, संस्था आणि समाज — सर्वांसाठी चांगले परिणाम मिळतात,” असे अनुज धीर, वरिष्ठ उपाध्यक्ष आणि बिझनेस हेड, कमर्शियल अँड इन्स्टिट्यूशनल बिझनेस, विप्रो कंझ्युमर केअर अँड लायटिंग यांनी सांगितले.

       

इनडोअर हवेतील प्रदूषण हा एक अदृश्य पण गंभीर धोका आहे जो अनेकदा दुर्लक्षित केला जातो, परंतु बाहेरील हवेपेक्षा आतील हवा अधिक हानिकारक असू शकतो. संशोधनानुसार, कामाच्या ठिकानाची हवा बाहेरील हवेपेक्षा २ ते ५ पट अधिक प्रदूषित असू शकते, आणि काही अत्यंत परिस्थितींमध्ये ती १०० पट जास्त प्रदूषित असू शकते. या वाढत्या समस्येला प्रतिसाद म्हणून, विप्रोने सादर केलेले नवीन इनडोअर एअर क्वालिटी मॉनिटरिंग सोल्यूशन्स संस्थांना अधिक आरोग्यदायी आणि सुरक्षित इनडोअर वातावरण निर्माण करण्यात मदत करतात.

विप्रो आपल्या IoT-सक्षम लायटिंग तंत्रज्ञानाद्वारे स्मार्ट बिल्डिंग क्षेत्रात नवकल्पनेचे नेतृत्व करत आहे. हे तंत्रज्ञान मानवकेंद्रित आणि सर्वांगीण वातावरण निर्माण करण्यासाठी डिझाइन केले गेले आहे.

ही बुद्धिमान प्रणाली वैयक्तिक नियंत्रणाची सुविधा, मानवी जैविक घड्याळाशी (circadian rhythm) सुसंगत प्रकाशयोजना, तसेच जागरूकता आणि मनःस्थिती सुधारण्यास मदत करते. याशिवाय, ती चमक-रहित, ऊर्जा-कार्यक्षम आणि दृक्-सुखद प्रकाशयोजना प्रदान करते.

याशिवाय, आज प्रदर्शित केलेली विप्रोची अॅक्यूस्टिक लायटिंग सोल्यूशन्स उच्च दर्जाच्या कार्यक्षमता आणि डिझाइनच्या मानकांनुसार विकसित करण्यात आली आहेत. ही उत्पादने प्रकाशयोजना आणि ध्वनिशोषण (sound absorption) यांचा सुंदर संगम घडवतात. या नवकल्पनात्मक उपायांमुळे संस्थांना अधिक शांत, लक्ष केंद्रीत कार्यस्थळे निर्माण करता येतात, ज्यामुळे कर्मचाऱ्यांचे आरोग्य आणि संस्थेची कार्यक्षमता — दोन्ही सुधारतात.

* ‘डार्क स्काय’ प्रमाणित लायटिंग ही एक अमेरिकी संस्था आहे जी प्रकाशप्रदूषण कमी करण्याच्या विशिष्ट मानकांचे पालन करणाऱ्या लायटिंग उत्पादने, डिझाइन्स आणि प्रकल्पांना स्वतंत्र प्रमाणपत्र (थर्ड-पार्टी सर्टिफिकेशन) प्रदान करते.

टिकाऊपणासाठीच्या आपल्या बांधिलकीला आणखी एक पाऊल पुढे नेत, विप्रोने अभिमानाने भारतामध्ये पहिल्यांदाच स्वतः डिझाइन आणि तयार केलेली ‘डार्क स्काय’ प्रमाणित लायटिंग उत्पादने सादर केली आहेत. ही आऊटडोअर लायटिंग सोल्यूशन्स प्रकाशप्रदूषण कमी करण्यासाठी तयार करण्यात आली आहेत, ज्यामुळे मानवांसाठी कार्यक्षम प्रकाश उपलब्ध होतो आणि त्याच वेळी वन्यजीवांचे अधिवास आणि नैसर्गिक परिसंस्था जपली जातात. हे पाऊल पर्यावरणपूरक आणि जबाबदार शहरी विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरते.

लायटिंगच्या पलीकडेही आपली नवकल्पना विस्तारत, विप्रोने आरामदायी आसन रचना (एर्गोनॉमिक सीटिंग) क्षेत्रातही मोठी झेप घेतली आहे. ही उत्पादने शारीरिक स्थितीस आधार, आराम आणि दीर्घकालीन आरोग्य यांना प्रोत्साहन देण्यासाठी तयार केली गेली आहेत. कार्यस्थळाच्या गरजांचा सखोल अभ्यास करून तयार केलेल्या विप्रोच्या या सीटिंग श्रेणीत १०० पेक्षा अधिक डिझाइन्स समाविष्ट आहेत — ज्यात ऑफिस खुर्च्या, सॉफ्ट सीटिंग, ऑडिटोरियम सीटिंग आणि फोन बूथ्स यांचा समावेश आहे. प्रत्येक डिझाइन आजच्या गतिमान आणि बदलत्या कार्यपरिस्थितीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी काळजीपूर्वक तयार केलेले आहे.

  

विप्रो CIB आर्किटेक्ट्स, डिझाइनर्स, फॅसिलिटी मॅनेजर्स आणि बिझनेस लीडर्स यांच्यासोबत घनिष्ठ सहकार्य करून त्यांच्या सर्जनशील कल्पनांना तंत्रज्ञान, आराम आणि उद्देश यांचा समतोल साधणाऱ्या मानवकेंद्रित आणि कार्यक्षम जागांमध्ये रूपांतरित करण्यास मदत करते. या सहकार्यावर आधारित दृष्टिकोनामुळे विप्रो आज अनेक संस्थांसाठी विश्वसनीय भागीदार बनले आहे.

विप्रो CIB आपली ‘इनोव्हेशन फॉर ह्युमन स्पेसेस’ ही दृष्टी आणखी वेगाने पुढे नेत आहे, आणि त्यासाठी भारतभर आपल्या #myWiproverse अनुभव केंद्रांचे जाळे विस्तारत आहे. सध्या पुणे, हैदराबाद, चेन्नई आणि बेंगळुरू येथे ही केंद्रे कार्यरत आहेत, आणि मार्च २०२६ पर्यंत या नेटवर्कचा विस्तार सात ठिकाणी होणार आहे. या केंद्रांमध्ये ग्राहक आणि स्पेस डिझाइनर्सना विप्रोचे IoT-सक्षम लायटिंग, एर्गोनॉमिक सीटिंग आणि इनडोअर एअर क्वालिटी मॉनिटरिंग सोल्यूशन्स यांचा थेट आणि अनुभवात्मक परिचय मिळतो. ही केंद्रे दाखवतात की स्मार्ट तंत्रज्ञान कसे काम करण्याची, सहकार्य करण्याची आणि विश्रांती घेण्याची पद्धत बदलू शकते, तसेच ती विप्रोच्या टिकाऊपणावरील वचनबद्धतेचे उत्तम उदाहरण आहेत.

अनेक दशकांच्या अनुभवावर आधारित, विप्रो आता भविष्याभिमुख आणि धाडसी दृष्टीकोनासह आपल्या स्पेस डिझाइनच्या दृष्टिकोनाचे पुनर्मूल्यांकन करत आहे. विप्रो आता केवळ स्मार्ट स्पेसेस तयार करत नाही, तर मानवी गरजा आणि पर्यावरणीय प्राधान्यांना प्रतिसाद देणारी बुद्धिमान परिसंस्था (इंटेलिजंट इकोसिस्टम्स) निर्माण करत आहे.

$2.5 अब्ज मूल्याच्या विप्रो एंटरप्रायझेसचा एक भाग असलेले विप्रो CIB, आगामी काळात दोन अंकी वाढ (double-digit growth) साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे, ज्यामुळे लायटिंग आणि कार्यस्थळ नवकल्पनेच्या क्षेत्रात त्याचे नेतृत्व अधिक बळकट होईल. त्यांची ‘इनोव्हेशन फॉर ह्युमन स्पेसेस’ ही संकल्पना अशा भविष्यास अधोरेखित करते जिथे तंत्रज्ञान आणि डिझाइन एकत्र येऊन काम अधिक मानवी आणि सर्जनशील बनवतात.

 

विप्रो कमर्शियल अँड इन्स्टिट्यूशनल बिझनेस (CIB) बद्दल

विप्रो कमर्शियल अँड इन्स्टिट्यूशनल बिझनेस (CIB) हे US$ 2.5 अब्ज मूल्याच्या विप्रो एंटरप्रायझेसचे एक अंग असून, ते विप्रो कंझ्युमर केअर अँड लायटिंग या विभागाचा भाग आहे. तीन दशकांहून अधिक अनुभवासह, विप्रो लायटिंग हे आपल्या आधुनिक ‘इंटरनेट ऑफ लायटिंग (IoL)™’ सोल्यूशन्स आणि डिझाइन उत्कृष्टतेसाठी ओळखले जाते. अलीकडेच झालेल्या विप्रो लायटिंग आणि सीटिंग सोल्यूशन्सच्या विलीनीकरणामुळे, कंपनीची नवकल्पनाशील उत्पादने सादर करण्याची क्षमता आणखी मजबूत झाली आहे, ज्यामुळे ती उद्योगातील एक अग्रगण्य संस्था म्हणून आपले स्थान अधिक दृढ करत आहे.


उत्पादनासंबंधी चौकशीसाठी संपर्क:

https://wa.me/911800228222

t: 18004251969

https://www.wiprolighting.com/

Comments

komalaws said…
Informative post! The Dell Laptop Service Center in Matunga provides affordable services, doorstep assistance, and out-of-warranty repairs for all Dell laptops. Our skilled technicians deliver fast, professional solutions with genuine parts. Call +91-9891868324 / +91-8860510848 for trusted multi-brand laptop repair in Matunga.

Popular posts from this blog

Tamasha World HD premier on &pictures HD

Here are 5 age defying love stories on Hindi television that proved that love has no age-bar.

Home First Finance Company India Ltd on boards GALF for Holistic Wellbeing of Employees