प्रबोधन-मार्मिक कथास्पर्धा २०२५ चा निकाल जाहीर
साहित्य सेवक वसंत तावडे स्मृती कथास्पर्धा २०२५
‘धुकं’ या कथेला प्रथम क्रमांक
मुंबई – प्रबोधन गोरेगाव आणि साप्ताहिक मार्मिक यांच्यातर्फे, शिवसेना नेते व प्रबोधन गोरेगावचे संस्थापक सुभाष देसाई यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित साहित्य सेवक वसंत तावडे स्मृती कथास्पर्धा २०२५ चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला.
या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार (₹१५,०००) डॉ. क्षमा संजय शेलार लिखित ‘धुकं’ या कथेला प्राप्त झाला आहे. ही कथा साप्ताहिक मार्मिकच्या २०२५ च्या दिवाळी अंकात विशेषत्वाने प्रकाशित होणार आहे.
द्वितीय क्रमांकाचा (₹१०,०००) पुरस्कार प्रभाकर महादलिंग मठपती यांच्या ‘शेकडा पाच’ या कथेला तर तृतीय क्रमांकाचा (₹७,५००) पुरस्कार विनय दिलीप खंडागळे यांच्या ‘टिचल्या बांगड्यांचं घर’ या कथेला देण्यात आला आहे.
याशिवाय खालील लेखकांना प्रत्येकी ₹५,००० चे उत्तेजनार्थ पुरस्कार जाहीर झाले आहेत:
योगिनी श्रीनिवास पाळंदे – ‘नवीन नाते’
प्रसाद अनंत खानोलकर – ‘दुतोंडी अजगर’
डॉ. मोनाली हर्षे – ‘अट्टाहास’
तसेच, प्राजक्ता प्रशांत आपटे लिखित ‘नाटक’ ही कथा स्पर्धेतील सर्वोत्तम विनोदी कथा ठरली असून तिलाही ₹५,००० चा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
या स्पर्धेला दुसऱ्या वर्षीही महाराष्ट्रासह गुजरात आणि कर्नाटक येथून भरघोस प्रतिसाद मिळाला. एकूण १५० पेक्षा अधिक कथा प्राप्त झाल्या. मार्मिकचे संपादक मुकेश माचकर,नामवंत विनोदी लेखक सॅबी परेरा आणि पत्रकार-कवी विनोद पितळे यांनी परीक्षक म्हणून भूमिका बजावली. प्राथमिक छाननी विजय नाडकर्णी, तर समन्वयाची जबाबदारी गोविंद गावडे यांनी पार पाडली.
पुरस्कार वितरण सोहळा लवकरच दिमाखदार पद्धतीने आयोजित केला जाणार आहे, आणि यासंदर्भात सर्व सहभागी स्पर्धकांना लवकरच पूर्वसूचना पाठवण्यात येईल.
No comments:
Post a Comment