मुंबई – वर्सोवा परिसरातील श्रद्धेचं आणि भक्तीचं केंद्र मानल्या जाणाऱ्या आणि
सर्वधर्मीयांचा नवरात्रौत्सव म्हणून ख्याती असलेल्या श्री गणेश साई मंदिर ट्रस्टने यारी रॊड येथे यंदा केरळ येथील त्रिशूरच्या वडक्कुन्नाथन मंदिराच्या देखावा उभारला आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रौउत्सव मोठ्या उत्साहात आणि भव्यतेने साजरा करण्यात येत आहे.उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी ट्रस्टचे अध्यक्ष कमलाकर पाटील, सचिव विकास पाटील आणि खजिनदार अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली येथे नवरात्रौत्सवात जल्लोषात व उत्साहात साजरा केला जात आहे.
गेल्या चार दशकांपासून धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला जपत हा नवरात्रौउत्सव वर्सोवा परिसरातील भाविकांसाठी एक पर्वणी ठरत आला आहे. हा देखावा भाविकांना भक्तीबरोबरच सांस्कृतिक वैविध्याचाही अनुभव देणार असून भाविकांनी येथे दर्शनासाठी गर्दी केली आहे.
येथे साकारलेल्या मद्रासच्या मंदिराचा देखाव्यात सिहांवर आरूढ झालेली १० फूटी दुर्गामतेची मूर्ती मालाडचे मूर्तीकार विकास राठोड यांनी अत्यंत देखणी आणि भावस्पर्शी मूर्ती साकरली आहे.मंडपाच्या कलात्मक सजावटीसाठी कलादिग्दर्शक राहुल डी. रे आणि देवेंद्र मिश्रा यांनी परिश्रम घेतले आहेत.तर संपूर्ण उत्सवाचे छायाचित्रण छायाचित्रकार उमेश वाघेला करत आहे.देखाव्याच्या निर्मितीत ट्रस्टचे कार्यकर्ते विनीत पाटील यांचे विशेष योगदान आहे.
श्री गणेश साई मंदिर ट्रस्टचे सचिव विकास पाटील यांनी सांगितले की, श्री गणेश साई मंदिराचे यंदा ४० वे वर्ष असुन दररोज साधरणतः ८ त १० हजार भाविक दर्शनाचा लाभ घेतात.यावेळी कोळी बांधवही मोठ्या संख्यने उपस्थित असतात. येथील खास वैशिष्ठ म्हणजे मंदिर आणि मदीना मस्जिद आजू बाजूला असून मोठ्या संख्येने अल्पसंख्याक बांधवांसह सर्व जाती धर्माचे नागरिक येथील नवरात्रौत्सवात सामील होतात.रात्री सर्वासाठी मोफत गरब्याचे आयोजन केले असते. येथील देवीच्या दर्शनाला सर्व धर्मीय राजकीय नेते,सेलिब्रेटी आणि अनेक मान्यवर भेट देतात. देवीचे दसऱ्याच्या दिवशी मोठ्या उत्साहाने वर्सोवा मढजेट्टी येथे रात्री विसर्जन होते.
No comments:
Post a Comment