Monday, September 22, 2025

आरेत शासकीय योजना मार्गदर्शन शिबीराला मिळाला उस्फूर्त प्रतिसाद


मुंबई-नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने शासनाच्या शासकीय योजना सर्व सामान्य जनते पर्यंत पोहचाव्यात या करिता नवक्षितिज ट्रस्टचे अध्यक्ष सुनिल कुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी  गोरेगांव पूर्व,आरे युनिट क्र ६, श्री स्वामी समर्थ मठ  येथे दुपारी ३.३० ते ६.३० यावेळेत शासकीय योजनांचे मार्गदर्शनपर शिबीर आयोजित केले होते.या शिबीराला आरेवासीय आणि पश्चिम उपनगरातील नागरिकांचा व महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.त्यांनंतर श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मान्यवरांनी सविस्तर उत्तरे देवून त्यांचा शंकाचे निरसन केले.त्यांनी या शिबीराच्या यशस्वी आयोजना बद्धल कुमरे यांचे कौतुक केले.


यावेळी तहसिलदार बोरिवली इरेश चपलवार ,संजय गांधी निराधार योजना तहसिलदार अतुल सावे ,महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र प्रकल्प अधिकारी प्रदीप सावंत,रुग्णमित्र धनंजय पवार विनोद साडविलकर,कृष्णा कदम,जेष्ठ पत्रकार मनोहर कुंभेजकर आदी मान्यवर  उपस्थित होते


इरेश चप्पलवार म्हणाले की,नागरिकांना जन्मा पासून मृत्यू पर्यंतचा दाखला,

उत्तनाचा दाखला,१५ वर्षाचा रहिवासी दाखला,वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी दाखला अनुसूचित जाती जमातीचा दाखला आणि अन्य दाखले लवकर बोरिवली तहसील कार्यालयात मिळण्यासाठी सेतू कार्यालयाचे

आधुनिकीरण सुरू आहे.येत्या सुमारे दीड महिन्यात सदर काम पूर्ण झाल्यावर नागरिकांना येथील वातानुकूलित सेतू केंद्रात टोकन सिस्टीम प्रमाणे तात्काळ दाखले मिळतील असे ठाम प्रतिपदान बोरिवली तालुक्याचे तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी काल आरेत केले.नागरिकांच्या माहिती साठी येथे हेल्पडेस्क देखिल सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. येथील आदिवासी बाधवांना जातीचे दाखले लवकर मिळण्यासाठी या सेवा पंधरवड्यात येथे एक कॅम्प आम्ही आयोजित करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.शासन तुमचे,आम्ही तुमचे आहेत,कोणीही दाखल्यांपासून वंचित राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र प्रकल्प अधिकारी प्रदीप सावंत म्हणाले की,स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करायचा व स्वयंरोजगार कसा सुरू करायचा यासाठी सरकार मदत करते.उद्योग सुरू करण्यासाठी

2 लाखांपासून 2 कोटी पर्यंत भांडवल उपलब्ध करून दिले जाते.नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारे मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जाते. एक्स्पोर्टसाठी मार्गदर्शन दिले जाते.महिलांना सबसिडी दिली जाते.

 स्वतःचा उद्योग सुरू करून दुसऱ्याला उद्योजक तयार करा असे आवाहन त्यांनी केले.


संजय गांधी निराधार योजनेचे तहसीलदार अतुल सावे म्हणाले की,६५ वर्षा खाली निराधार,घटस्फोट, एकट्या राहणाऱ्या महिला,४० टक्के दिव्यांग एड्स,कॅन्सर, मतिमंद,ट्रान्सजेंडर या विविध

गटातील गरजू लाभार्थ्यांना या योजनेतून दरमहा त्यांच्या खात्यात १५०० रुपये जमा होतात,येत्या १ ऑक्टोबर पासून त्यांना दरमहा २५०० रुपये मिळणार आहे.


श्रावण बाळ योजने अंतर्गत निराधार दोघे नवरा बायकोला दरमहा १५०० रुपये,१८ ते ५९ गटातील स्त्री व पुरुष निधन झाले तर त्यांच्या निराधार व्यक्तीला वर्षाला २००००० रुपये लाभ मिळतो.

संजय गांधी निराधार  योजनेअंतर्गत ६० वर्ष आतील गरजूंना वर्षाला १ लाख मिळतात,यासाठी त्यांचे उत्पन्न

२१००० पेक्षा उत्पन्न कमी असावे लागते.दिव्यांग व्यक्तीला वर्षाला ५०००० रुपया पर्यंत मदत मिळते. आहे.२००० लाभार्थ्यांच्या  बँकेत दर महिन्याला ५ ते ८ तारखेपर्यंत  खात्यात पैसे जमा होतात अशी माहिती त्यांनी दिली.


रुग्णमित्र धनंजय पवार विनोद साडविलकर,कृष्णा कदम यांनी गरजूंना कशी वैद्यकीय मदत आम्ही मिळवून देतो, कोणत्या योजनांमधून त्यांना मदत मिळते.आता पर्यंत सुमारे आठ हजार गरजू रुग्णांना आम्ही वैद्यकीय मदत मिळवून दिली असल्याचे त्यांनी 

सांगितले.गरजूंना लवकर उत्पनाचा दाखला मिळावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


आयोजक सुनील कुमरे म्हणाले की,मान्यवरांचे शाल,तुळशीचे रोपटे देवून स्वागत केले.

शासकीय मार्गदर्शन शिबीराला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.अश्या प्रकारची शिबीरे आरेत आयोजित केली जातील.संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत गरजूंची उत्पन्न मर्यादा २१००० वरून किमान ६०००० रुपये करणे गरजेचे आहे.तरच या योजनेला चांगला प्रतिसाद मिळेल.


No comments:

15th edition of Sunday Soul Sante, India's leading lifestyle and flea market.

S unday Soul Sante - Diwali Edition 2025 Celebrating 15 years, Sunday Soul Sante has grown from a flea market into a cultural movement, unit...