मुंबई-मालाड पश्चिम प्रभाग क्रमांक ४६ मधील पालिकेच्या आरामबाग हिंदू स्मशानभूमीचे रुपडे पालटणार आहे.केंद्रीय वाणिज्य मंत्री व उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली व येथील भाजपाच्या माजी नगरसेविका योगिता सुनील कोळी यांच्या अथक प्रयत्नाने व सुनील कोळी यांच्या पाठपुराव्याने येत्या सहा महिन्यात या स्मशानभूमीचा चेहरामोहरा बदलणार आहे.पालिकेच्या अर्थसंकल्प निधीतून या स्मशानभूमीचे नूतनीकरण करण्यात येणार आहे.
येथील स्मशानभूमीचे नूतनीकरणाचा शुभारंभ शनिवारी सकाळी ब्रह्माकुमारीच्या मालाडच्या पश्चिमच्या प्रमुख नीरजा बेन आणि भाजयुमोचे मुंबई अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून संपन्न झाला.यावेळी मुंबई भाजपा सचिव युनूस खान,सुनील कोळी,योगिता कोळी,भाजयुमोच्या राष्ट्रीय सदस्य माधवी गुप्ता,पालिकेचे पी उत्तर विभागाचे कार्यकारी आरोग्य अधिकारी तुळशीदास तर्पे,उपअभियंता कोमल भगत आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी तेजिंदरसिंग तिवाना यांनी सुनील कोळी आणि योगिता कोळी यांच्या कार्याचा गौरव केला.पियुष गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर मुंबईतील स्मशानभूमी आणि तलावांचे सुशोभिकरणं
करण्यात येणार असून उत्तर मुंबई ही उत्तम मुंबई होणार आहे.तसेच मुंबईचा कायापालट करण्यासाठी पालिकेत भाजपाचा महापौर विराजमान होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी सुनील कोळी म्हणाले की,१६ वा अंतिम संस्कार सुखकर व्हा यासाठी या स्मशानभूमीच्या नुतनीकरणात १४ कामे प्रस्तावित आहे. यामध्ये प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण, जळावू लाकडांसाठी शेडचे बांधकाम,दहन कक्षाची दुरुस्ती व रंगकाम,चेजिंग रुमचे बांधकाम, प्रार्थना सभागृहाची दुरुस्ती,परिसरात कॉंक्रीटीकरण करणे,संरक्षक भिंतीची दुरुस्ती करणे,दहन कक्षातील पत्रे बदलणे,लादीकरण,पथ दिवे-एल ईडी व फ्लड लाईट्स बसवणे आदी प्रमुख कामांचा समावेश आहे.
शिवमंदिर आणि बाजूचे प्रार्थना गृहाचे नूतनीकरण पियुष गोयल यांच्या खासदार निधीतून करण्यात येणार आहे.येथील नागरिकांच्या मागणीनुसार येथील स्मशानभूमीत विद्युत दाहिनी देखिल आपल्या अथक प्रयत्नांने सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली.
No comments:
Post a Comment