*साहित्यविश्व प्रकाशन* निर्मित आणि मानवाधिकार सामाजिक कार्यकर्ते *विकास कुचेकर* लिखित *“संविधान बोलतंय… नागरिकांच्या संवेदनांचा आवाज”* या संविधानिक मूल्यांवर आधारित असणाऱ्या एका आगळ्या वेगळ्या पुस्तकाच्या ऐतिहासिक प्रकाशन सोहळ्यातील अविस्मरणीय क्षण...
मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्था, पुणे यांच्या वतीने आयोजित "जागर मानवी हक्कांचा” या मानवी हक्क संवर्धन व जनजागृती कार्यक्रमात विकास कुचेकर लिखित सर्व भारतीय नागरिकांसाठी साकारलेल्या... ‘संविधान बोलतंय… नागरिकांच्या संवेदनांचा आवाज’ या साहित्यविश्व प्रकाशन निर्मित पुस्तकाचे प्रकाशन पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती माननीय महेंद्र के. महाजन, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधीश माननीय रेवती देशपांडे, निवृत्त प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. जटाळे, सुधाकरराव जाधवर शिक्षण संस्था समूहाचे अध्यक्ष डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अँड. शार्दुल जाधवर, लेफ्टनंट कर्नल श्रीश कुमार, मानव अधिकार संरक्षण आणि जागृती संस्थेचे अध्यक्ष श्री. विकास कुचेकर आणि साहित्यविश्व प्रकाशनाचे प्रमुख विक्रम मालन आप्पासो शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.... समाजाच्या प्रत्येक स्तरातील नागरिकांच्या हक्क–कर्तव्यांची जाणीव, संविधानाचे जिवंत दर्शन आणि मानवी हक्कांची प्रसंग, कथा, संवादांमधून पूरक मांडणी ही या पुस्तकाच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. ...