Friday, May 3, 2024

डॉ. राजेंद्र झुंजारराव यांच्या "झुळूक"ला महाराष्ट्र साहित्य परिषद, चिंचवड शाखेचा पुरस्कार प्रदान


पुणे, ३ मे २०२४ : मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स, शिवाजीनगर पुणेचे प्राचार्य. डॉ. राजेंद्र झुंजारराव यांच्या "झुळूक" या काव्यसंग्रहाला  महाराष्ट्र साहित्य परिषद, चिंचवड शाखेचा अपर्णा मोहिले स्मृती लक्ष्यवेधी वांग्मय पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र साहित्य परिषद, चिंचवड आयोजित निगडी येथील शांता शेळके सभागृहात मसाप च्या राज्यस्तरीय वांग्मय पुरस्कार - २०२४ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी आणि माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.  महाराष्ट्र  साहित्य परिषद चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे, कार्याध्यक्षा विनिता ऐनापुरे, रजनी शेठ आदी यावेळी उपस्थित होते. डॉ. राजेंद्र झुंजारराव यांचे आजपर्यंत "फुलोरा, ओंजळ, गुंफण, झुळूक आणि बहर" हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले असून त्यांच्या काव्यसंग्रहांना महाराष्ट्रातील नामांकित साहित्य संस्थांचे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. मानसिक आरोग्य आणि कवितेतून आत्मानंद देणाऱ्या त्यांच्या कविता आहेत. "झुळूक" या काव्यसंग्रहाचे प्रकाशक आणि साहित्यविश्व प्रकाशनाचे प्रमुख विक्रम मालनआप्पा शिंदे यांनी याबद्दल त्यांचे अभिनंदन केले व लोकोपयोगी चांगल्या साहित्य लिखाणासाठी शुभेच्छा दिल्या.


संपर्क.

साहित्यविश्व प्रकाशन, पुणे.

9373696852

No comments: