Sunday, March 31, 2024

*किमयागार जोकर - मी घडणार अशी* ह्या कार्यक्रमाला महिलांचा उदंड प्रतिसाद.

महिलांसाठी सदैव झटणारे आणि त्यांच्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणारे आरे कॉलनी गोरेगाव येथील एक सुप्रसिद्ध नाव म्हणजे  सुनील कुमरे. 

आपल्या विभागातील महिलांसाठी  नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई अध्यक्ष सुनिल कुमरे आणि ट्रस्टच्या महिला अध्यक्षा श्रद्धा शिंदे यांनी   क्रॅकरजॅक ॲक्टिंग क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 30/3/24 रोजी  *किमयागार जोकर - मी घडणार अशी* ह्या   विनामूल्य *पर्सनालिटी प्रोग्रेस प्रोग्रॅम* चे आयोजन केले होते.   दैनंदिन जीवनाच्या घाई गडबडीत अनेकदा महिलांचे स्वतः कडे लक्ष देण्याचे राहून जाते. अशा परिस्थिती स्वतः च्या व्यक्तीमत्वाचा विसर पडतो व व्यक्तीमत्वात काळानुरूप प्रगती न होता आयुष्याच्या रहाटगडग्यात स्त्री 

फरफटत जाते. स्वतःच्या अस्तित्वाची योग्य जाणीव ठेवून स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात योग्य ती प्रगती साधता यावी हा ह्या कार्यशाळेचा हेतू होता.  

कार्यशाळेची वैशिठ्ये

✅ स्वतःला समजून घेणे,

✅ मानसिक आणि शारीरिक स्ट्रेस रीलीव,

✅ आवाजातील चढ उतार

✅ बोलण्यातील सहजता आणि नेमकेपणा

✅ Body Language

✅ आत्मविश्वास वाढवणे

✅ personality बद्दल गमतीदार खेळ ह्या कार्यशाळेत घेण्यात आले.

आरे कॉलनी व्यतिरिक्त गोराई, मरोळ येथील स्त्रियांनी तसेच अंगणवाडी सेविका आणि आरोग्य सेविका ह्यांनीदेखील आपली उपस्थिती लावली. 

दैनंदिन जीवनातील उदाहरणे देत छोट्या छोट्या बदलांची सुरुवात केल्यास आपण नक्कीच प्रगती साधू शकतो असे प्रतिपादन करीत लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, कंटेंट रायटर , ट्रेनर जयेश राजे  यांनी विविध खेळ घेत विविध व्यक्तिमत्वाचे प्रकार समजावून दिले. निवेदिका , सूत्रसंचालिका आणि  मुलाखतकार रुपाली वीरकर - जोशी ह्यांनी सूत्रसंचालन व निवेदन ह्यातील फरक समजावून सांगितला तसेच ह्यासाठी काय काय तयारी करायला हवी ह्यासाठी मार्गदर्शन केले. अभिनेत्री, एडिटर हर्षदा दाते ह्यांनी श्वासाचे विविध प्राणायाम तसेच उत्तम वाणीकरिता चेहऱ्याचे व्यायाम घेतले. आयटा ट्रेनर, लेक्चरर, ग्रुमिंग कोच भारती पाटील यांनी वागता बोलताना आपली देहबोली कशी असावी, आत्मविश्वास कसा वाढवावा ह्याबद्दल मार्गदर्शन केले. 

तीन तासाच्या वेळेत महिलांनी आवर्जून प्रत्येक खेळात सहभाग घेतला. 


 नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष सुनिल कुमरे,  सचिव धर्मराज तोकला व 

नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्ट महिला विभाग मुंबईच्या अध्यक्षा 

सौ श्रद्धा विश्वास शिंदे

अध्यक्षा, महिला विभाग महासचिव अंकिता मांजरेकर  सहित अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

1 comment:

Joy said...

आदर्श नगर येथील किमयागार महिलांशी रु-ब-रु हून आम्हाला देखील एक वेगळा अनुभव मिळाला. ह्या निमित्ताने सुनीलभाऊ कुमरे ह्यांचे देखील आभार !