Wednesday, February 28, 2024

जागतिक महिला दिनाचे औचित साधून 10 मार्च 2024 दुपारी 2 ते 6 पर्यत नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने गावदेवी मंदिर युनिट क्र 4 आरे कॉलनी गोरेगाव पूर्व येथे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलाचा नवक्षितिज नारी सन्मान पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे

प्रसिद्ध निवेदिका tv9 सौ प्रज्ञा कुलकर्णी हस्तक ( पत्रकारिता), सौ सुषमा दवडे ( सामाजिक ), सौ प्रमिला मसराम ( सामाजिक ) कु. कोमल सुभाष देवकर ( क्रीडा ), सौ संपदा अमोल झिगाडे ( कला ),सौ संगीता थोरात ( कला ), सौ नलिनी बुजड ( सामाजिक ),सौ कल्पना नाईक ( सामाजिक ), सौ निता कमलाकर डांगे ( आरोग्य ), सौ शामल देसाई (  सामाजिक )कु रसिका चंद्रकांत अवेरे ( क्रीडा ) यांना पुरस्कार देऊन गौरव गौरवण्यात  येणार आहे

 यावेळी माहिती अधिकारी कार्यकर्ता व वरिष्ठ पत्रकार अनिल गलगली, समाजसेवक व जेष्ठ वकील उच्च न्यायालय जगदीश जायले, शिवसेना उपनेते अमोल कीर्तिकर, मुंबई काँग्रेस महासचिव संदेश कोडविलकर,अभिजित राणे सरचिटणीस धडक कामगार युनियन व कामगार नेते,समाजसेवक व उद्योगपती ईश्वर रणशूर, औषधी निर्माण तज्ञ व्याख्याते डॉ. महेश अभ्यंकर, व्याख्याता व समुपददेशक रत्नप्रभा गोमासे आदि मान्यवराच्या उपस्थित पुरस्कार वितरण सोहळा पार पडला जाणार आहे

यावेळी महिलांच्या मनोरंजना करीता सन्मान नारीचा खेळ पैठणीचा रंगारग कार्यक्रम सिने- नाट्य अभिनेता सचिन कामतेकर सादर करणार आहे

 यात मोठ मोठी बक्षीसे व उपस्थित सर्व महिलांना आकर्षक भेटवस्तू दिली जाईल तरी मोठ्या संख्येत महिलांनी उपस्थित राहून जल्लोषात  जागतिक महिला दिन साजरा करावा असे  नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुनिल कुमरे, सायली भोसले,श्रद्धा शिंदे, सुनिधी कुमरे, रेखा बिहारे, सुरेखा घुटे, संध्या मोहिते, गीता राजपूत, शारदा नादगावकर, कल्पना बिहारे यांनी कळविले आहे

No comments: