Sunday, January 28, 2024

नवक्षितिज महाराष्ट्र गौरव पुरस्काराने राज्यातील 26 रत्ने सन्मानित

 


मुंबई-नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्ट,आरे, गोरेगाव (पूर्व )  या सेवाभावी संस्थेच्या वतीने आज गोरेगाव (पूर्व ),भानुबेन नाणवटी कलाघर, नंदादीप शाळा, जयप्रकाश नगर येथे राजस्तरीय नवक्षितिज महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2024 

सोहळा आयोजित केला होता.या सोहळ्याचे

आयोजन ट्रस्टचे अध्यक्ष सुनील कुमरे यांनी केले होते.सुमारे साडेतीन तास हा शानदार सोहळा रंगला होता.


या कार्यक्रमाला पंजाब-हरियाणाचे माजी न्यायमूर्ती व डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाचे चेअरमन अरुणकुमार चौधरी,निर्मलकुमार देशमुख (आयएएस ),मोहन राठोड ( आय पी एस ),कामगार नेते अभिजित राणे,मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस संदेश कोंडविलकर,उत्तर पश्चिम मुंबई कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष क्लाव्हई डायस,निवड समिती पुरस्कार सोहळा अध्यक्ष इमरान राही, जेष्ठ पत्रकार मनोहर कुंभेजकर,औषध निर्माणतज्ञ-व्याख्याते डॉ.महेश अभ्यंकर,

नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्टचे सल्लागार रफिक शेख आदी मान्यवर उपस्थितीत होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदिका 

संगीता थोरात यांनी केले.


या मान्यवरांनी आपल्या भाषणात सुनील कुमरे यांच्या कार्याचा गौरव केला.ते एक हार्डकोर कार्यकर्ते असून नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्ट सारख्या सेवाभावी संस्थांचे इतर संस्थांनी अनुकरण करून महाराष्ट्रात अश्या संस्था वाढीस लागणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.


नवक्षितिज महाराष्ट्र गौरव पुरस्काराने राज्यातील प्रशासकीय, आरोग्य, क्रीडा, सामाजिक, कला, शैक्षणिक, या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या  एकूण 26 जणांना गौरवशाल,सन्मानचिन्ह,मानपत्र,मेडल,तुळशीचे रोपटे देवून गौरवण्यात आले.


यामध्ये राजीव गायकवाड (नागपूर), सिध्दी मणेरीकर,अँड जगदीश जायले (मुंबई),  डॉ.इंद्रजीत खांडेकर (सेवाग्राम वर्धा), ,स्नेहा  कोकणे पाटील (नाशिक) ,पियू चौहान (मुंबई),सुनिता नागरे (मुंबई),सुप्रिया चव्हाण (मुंबई),डॉ महालक्ष्मी वानखेडकर (मुंबई),दत्ता शिरसाट (मुंबई),सुजाता  तावडे (मुंबई) ,शंकर बळी (मुंबई), सचिन कामतेकर (मुंबई) ,रंजना संखे (पालघर),शुजाउद्दीन शाहिद (मुंबई),प्राचार्य प्रकाश खंडार (वर्धा) , आरिफ पटेल (मुंबई) ,माही राठोड (मुंबई) ,फरहान हनीफ शेख (मुंबई), राहुल मोहन (नवी मुंबई),सुप्रिया चव्हाण (मुंबई)  ,डॉ जतीन वालिया( मुंबई) , ,राजेश पवार (मुंबई) ,मुकुंदराव मसराम (वर्धा) ,किरण फुलझले (नागपूर), अशा महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांमधील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना नवक्षितिज महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.


 नवक्षितिज महाराष्ट्र गौरव पुरस्काराने राज्यातील प्रशासकीय, आरोग्य, क्रीडा, सामाजिक, कला, शैक्षणिक, या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या  एकूण 26 जणांना गौरवशाल,सन्मानचिन्ह,मानपत्र,मेडल,तुळशीचे रोपटे देवून गौरवण्यात आले.यावेळी ट्रस्टचे सचिव धर्मराज तोकला, खजिनदार दिपक शिंदे, तसेच पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते .

No comments: