Tuesday, March 28, 2023

सोटॅक फार्मास्‍युटिकल्‍स लि. २८ मार्च रोजी त्‍यांचे आयपीओ आणणार

 

एनएसई इमर्ज प्‍लॅटफार्मवर सूचीबद्ध होणार

अहमदाबाद स्थित सोटॅक फार्मास्‍युटिकल्‍स लि. कर्ज परवाना किंवा कंत्राट उत्‍पादनाच्‍या आधारावर उच्च दर्जाच्‍या फार्मास्युटिकल उत्पादनांच्या निर्मितीमध्ये विशेषीकृत आहे. कंपनीने ३०,००,००० शेअर्ससाठी आपला आयपीओ जाहीर केला आहे, जेथे प्रति इक्विटी शेअरची किंमत १०५ ते १११ रुपये असेल आणि प्रत्येक इक्विटी शेअरचे दर्शनी मूल्य १० रुपये असेल. शेअर्स १२०० शेअर्सच्या लॉट आकारामध्‍ये विकले जातील. ३०,००,००० शेअर्सपैकी १४,२३,२०० शेअर्स क्‍यूआयबी कोट्यासाठी (अँकर रिझर्व्‍हेशनसह) आरक्षित असतील, ४,२८,४०० शेअर्स एचएनआय कोट्यासाठी आरक्षित असतील, ९,९८,४०० शेअर्स रिटेल कोट्यासाठी आरक्षित असतील आणि १,५०,००० शेअर्स मार्केट मेकर कोट्यांतर्गत आरक्षित असतील. इश्‍यू २८ मार्च रोजी अँकरसाठी आणि २९ मार्च रोजी लोकांसाठी खुला होईल. ३ एप्रिल २०२३ रोजी इश्यू बंद होईल. त्‍यानंतर ते एनएसई इमर्ज प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध केले जाईल. बीलाइन कॅपिटल अॅडव्हायझर्स प्रा. लि. इश्यूची लीड मॅनेजर आहे आणि केफिन टेक्‍नॉलॉजीज लि. इश्‍यूची रजिस्‍ट्रार आहे. 

इश्‍यूमधून प्राप्‍त उत्‍पन्‍न पुढील बाबींसाठी वापरण्‍यात येईल: 

खेळत्‍या भांडवल गरजांची पूर्तता करण्‍यासाठी 

उपकंपनीमध्‍ये गुंतवणूक 

सध्‍याच्‍या आवारामधील विद्यमान/नवीन इमारतीचे अपग्रेडेशन/बांधकाम 

सामान्‍य कॉर्पोरेट उद्देश 

इश्‍यू खर्च 

सोटॅक फार्मास्‍युटिकल्‍सचा वैविध्‍यपूर्ण उत्‍पादन पोर्टफोलिओ आहे, ज्यामध्ये फार्मास्युटिकल्स, न्यूट्रास्युटिकल्स आणि खाद्य उत्पादनांचा समावेश आहे. त्यांची अत्याधुनिक उत्पादन सुविधा त्यांना टॅब्‍लेट्स (औषधांच्‍या गोळ्या), कॅप्सूल्‍स, ओरल लिक्विड्स, ड्राय सिरप आणि मलम, लोशन व क्रीम यांसारख्या बाह्य तयारीसह उच्च दर्जाची उत्पादने तयार करण्यास सक्षम करते. उत्पादन युनिट १ अहमदाबाद जिल्ह्यातील सानंद जीआयडीसी-Il येथे आहे. या केंद्रामध्‍ये सर्वसमावेशक उत्पादन युनिट, गुणवत्ता नियंत्रण विभाग, मायक्रोबायोलॉजिकल प्रयोगशाळा आणि कच्चा माल व तयार उत्पादनांची साठवण आहे, ज्याला जागतिक आरोग्य संघटनेच्या गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस (डब्‍ल्‍यूएचओ जीएमपी) मानकांनी मान्यता दिली आहे. बीटा लॅक्टम उत्पादनांसाठी उत्पादन युनिट २ हे देखील अहमदाबाद जिल्ह्यातील सानंद जीआयडीसी-Il येथे आहे. हे जागतिक आरोग्य संघटनेच्या गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस (डब्‍ल्‍यूएचओ जीएमपी) मानकांद्वारे मंजूर केले गेले आहे. मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उच्च सुरक्षा आणि पर्यावरणीय मानकांवर कार्य करतो, दूषित होण्याची शक्यता कमी करण्यासाठी आवश्यक विलगीकरण आणि प्रक्रिया व विभागांचे वेगळेपणा सुनिश्चित करतो. त्यांच्या प्रभावी ग्राहकांच्या यादीमध्ये कॅडिला फार्मास्युटिकल्स, इंटास, रोनक हेल्थ केअर, सनरेस्ट लाइफसायन्सेस, लिंकन फार्मास्युटिकल्स, ट्रीटवेल फार्मा अशा बऱ्याच कंपन्‍यांचा समावेश आहे. कंपनीची उत्‍पादने संपूर्ण भारतात व जगभरात उपस्थित आहेत.

कंपनीने नुकतेच क्षमता विस्‍तारीकरण पूर्ण केले आहे आणि त्‍यांची उपकंपनी सोटॅक लाइफसायन्‍सेस प्रायव्‍हेट लिमिटेडमध्‍ये आगामी सुविधा आहे, जी विकासासाठी लक्षणीय संधी देते. विद्यमान न वापरलेल्‍या क्षमतांचा वापर केल्‍याने परतावा गुणोत्तर वाढवण्‍याची अपेक्षा आहे. संपूर्ण मालकीची उपकंपनी सोटॅक रिसर्च प्रायव्हेट लिमिटेडमध्‍ये कंपनीच्‍या उत्तमरित्‍या सुसज्‍ज संशोधन व विकास क्षमता आहेत. कंपनीच्या प्रगतीला तिच्या विविध पार्श्वभूमीच्या अनुभवी प्रवर्तकांचा पाठिंबा आहे आणि विविध उद्योगांमध्ये ५९ वर्षांचा एकत्रित अनुभव आहे. त्यांचे नेतृत्व, मार्गदर्शन व धोरणात्मक पर्यवेक्षण कंपनीच्या यशात आणि वाढीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.  

सोटॅक फार्मास्‍युटिकल्‍सने गेल्‍या काही वर्षांमध्‍ये प्रभावी आर्थिक वाढीची नोंद केली आहे. आर्थिक वर्ष २०२३ च्‍या पहिल्‍या सहामाहीसाठी कंपनीचा कार्यसंचालनांमधून एकत्रित महसूल ३९.७५ कोटी रूपये, तर आर्थिक वर्ष २०२२ साठी ७३.१५ कोटी रूपये आणि आर्थिक वर्ष २०२१ साठी ४८.८४ कोटी रूपये होता. आर्थिक वर्ष २०२३ च्‍या पहिल्‍या सहामाहीसाठी कंपनीचा एकत्रित ईबीआयटीडीए ३.६८ कोटी रूपये होता, तर आर्थिक वर्ष २०२२ साठी ६.१४ कोटी रूपये आणि आर्थिक वर्ष २०२१ साठी १.४६ कोटी रूपये होता. कंपनीने आर्थिक वर्ष २०२३ च्‍या पहिल्‍या सहामाहीसाठी एकत्रित पीएटी (करोत्तर नफा) ०.४७ कोटी रूपये नोंदवला, जो आर्थिक वर्ष २०२२ साठी २.८८ कोटी रूपये होता.    

कंपनीचे प्रवर्तक श्री. शरदकुमार दशरथभाई पटेल, श्री. दिनेशकुमार बाबुलाल गेलोट, श्री. विशालकुमार देवराजभाई पटेल, श्री. चेतनकुमार बच्चूभाई पटेल आणि श्रीमती किरण बलदेवभाई जोटानिया आहेत.


No comments: