Thursday, February 25, 2021

डव्हचे देशाला सौंदर्याच्या चाचण्या थांबवण्याचे आवाहन

भारत२५ फेब्रुवारी २०२१लग्न जुळवण्याच्या प्रक्रियेत स्त्रियांना सौंदर्यावर आधारित ठोकताळ्यांचा व नाकारले जाण्याचा सामना कसा करावा लागतो आणि त्याचा त्यांच्या आत्मसन्मानावर कसा परिणाम होतो हे दाखवणाऱ्या कठोर आणि वास्तववादी कथा डव्हच्या नवीन फिल्ममध्ये आहेत.

 

भारतातील सौंदर्याची चाचणी

सौंदर्याचा शोध नेहमीच कुरूप आणि पातळी खालावणारा असू शकतोठरवून केल्या जाणाऱ्या लग्नांमध्ये (अरेंज्ड मॅरेजेससौंदर्याच्या संकुचित कल्पनांना चिकटून राहण्याच्या तणाव व चिंतांबाबत अस्वस्थ करणारी आकडेवारी “इंडियाज ब्यूटी टेस्ट (२०२०रिपोर्टमधून समोर आली आहेलग्न जुळवण्याच्या प्रक्रियेत रूपाच्या निकषावर परीक्षा करून आपल्याला नाकारण्यात आल्याचा अनुभव भारतातील १० पैकी ९ स्त्रियांना येतोअसे यातून पुढे आले आहेयाशिवाय सौंदर्याच्या निकषावर नाकारण्यात आल्यामुळे आपल्या आत्मसन्मानावर व आत्मविश्वासावर परिणाम झाल्याचा दावा ६८ टक्के स्त्रियांनी केला आहे.

 

देशभरातील स्त्रियांशी केलेल्या संभाषणांतून डव्हची #StopTheBeautyTest ही फिल्म तयार झाली आहेयामध्ये स्त्रियांना लग्न जुळवण्याच्या प्रक्रियेत सुंदर नसल्याच्या कारणावरून नाकारण्यात आल्याच्या काही अपरिपक्व परिस्थितींचे चित्रण करण्यात आले आहेया निष्कर्षांचा त्यांच्या आत्मसन्मानावर तसेच आत्मविश्वासावर कसा प्रभाव पडतोयावर या फिल्ममध्ये भर देण्यात आला आहे.

 

अशा परिस्थितीत सापडलेल्या स्त्रियांनीच अभिनय केलेल्या खऱ्या कथांच्या माध्यमातून डव्ह एक प्रभावी संदेश देतोआपण स्त्रियांना सौंदर्याच्या या अन्याय्य परीक्षेतून जाण्यापासून थांबवले पाहिजेडव्हला हे महत्त्वपूर्ण संभाषण सुरू करायचे आणि सुरू ठेवायचे आहे.

 

पद्धतशीर बदलाची गरज

एचयूएलच्या कार्यकारी संचालक आणि ब्यूटी अँड पर्सनल केअर साउथ आशियाच्या उपाध्यक्ष प्रिया नायर यावरील कृतीबाबत म्हणाल्या, “६३१ दशलक्ष स्त्रियांच्या देशात सौंदर्याच्या एका व्याख्येला चिकटून राहण्याचा दबाव स्त्रीवर टाकला जातो हे दुर्दैवी आहेदेशातील काही सर्वांत मोठ्या सौंदर्यप्रसाधन ब्रॅण्ड्सचे मालक म्हणून आमच्या कंपनीवर सौंदर्याची कल्पना अधिक सकारात्मक व समावेशी करण्याची जबाबदारी आहेसौंदर्य हा आत्मविश्वासाचा स्रोत व्हायला हवाचिंतेचा नव्हेयावर डव्हचा कायम विश्वास राहिला आहे#StopTheBeautyTest या अभियानाच्या माध्यमातून आम्हाला या दिशेने पुढे जाण्याची इच्छा आहे.”

 

अभियानाच्या उद्दिष्टाला आधार देण्यासाठी डव्ह आघाडीच्या मॅट्रिमोनियल प्लॅटफॉर्मशी भागीदारी करत आहेलग्न जमवण्याची प्रक्रिया सौंदर्यावर आधारित पूर्वग्रहांपासून मुक्त करण्याच्या संयुक्त संकल्पनेतून या भागीदारी केल्या जात आहेतडव्ह आणि Shaadi.com एकत्र येऊन प्लॅटफॉर्मवरील वापरकर्त्यांना शरीराचा आकारत्वचेचा रंगचेहऱ्यांवरील ओरखडेकेसाचा प्रकार व लांबी यांच्या पलीकडे विचार करण्यास तसेच नवीन आकारमान व सौंदर्याच्या छटा पडताळून बघण्यास प्रोत्साहन देत आहेत.

 

शिवाय या दिशेने लक्षणीय बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने सौंदर्यविषयक पूर्वग्रहांपासून मुक्त अशा मॅट्रिमोनियल अॅड्स लिहिण्यात डव्ह मदत करणार आहेमाध्यमांद्वारे या बदलाची जोपासना करण्यासाठी डव्ह भारतातील आघाडीच्या विमेन मॅगझिन्ससोबतही भागीदारी करणार आहेलग्न जुळवण्याच्या प्रक्रियेत पुरेशा सुंदर नाहीत असा शिक्का मारला गेलेल्या स्त्रियांचे सौंदर्य याद्वारे साजरे केले जाणार आहे.

 

युनिसेफशी केलेल्या एका एक्स्लुजिव सहयोगाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या डव्ह आत्मसन्मान प्रकल्पाने २०२४ पर्यंत शाळेत जाणाऱ्या ६.२५ दशलक्ष मुला-मुलींपर्यंत पोहोचून त्यांचे ज्ञान व कौशल्ये वाढवण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहेजेणेकरून त्यांचा आपल्या शरीराबद्दलचा आत्मविश्वास व आत्मसन्मान वाढेल आणि शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून भारतात त्यांना आपली पूर्ण क्षमता आजमावता येईल.*

 

आपल्या सर्व ब्रॅण्ड्सच्या पोर्टफोलिओद्वारे सौंदर्याची व्याख्या उत्क्रांत करण्याच्या हिंदुस्तान युनिलिव्हरच्या जोरदार प्रयत्नांचा हा एक भाग आहेएचयूएल आणि डव्ह यांना जो मोठा बदल घडवून आणायचा आहे त्या दिशेने टाकलेले एक प्रागतिक पाऊल म्हणजे हे अभियान आहे.

 

ट्विटर आणि इन्स्टाग्रामद्वारे #StopTheBeautyTest या अभियानात सहभागी व्हाअधिक जाणून घ्याwww.dove.com/in/stop-the-beauty-test

अहवालाविषयी

इंडियाज ब्यूटी टेस्ट” हा डव्हचा अहवाल हन्सा रिसर्चद्वारे करण्यात आलेल्या एका स्वतंत्र सर्वेक्षणाचा निष्कर्ष आहेहे सर्वेक्षण डव्हने डिसेंबर २०२० मध्ये कमिशन केले होतेभारतातील १७ शहरांमधील १८ ते ३५ या वयोगटातील १०५७ स्त्रियांच्या एका ऑनलाइन प्रश्नावलीद्वारे मुलाखती घेण्यात आल्याया नमुन्यामध्ये प्रत्येक शहरातील स्त्रिया व मुलींना वयप्रदेश व सामाजिक श्रेणीद्वारे प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.

 

डव्ह विषयी 

डव्ह या ब्रॅण्डची सुरुवात अमेरिकेत १९५७ मध्ये ब्यूटी बार लाँच करून झालीहा ब्यूटी बार म्हणजे सौम्य क्लींजर्स व एक चतुर्थांश मॉइश्चुरायजिंग क्रीमचे पेटंटेड मिश्रण होतेडव्हचा वारसा मॉइस्चुरायजेशनवर आधारलेला आहेयाच पुरावाधारित वायद्याच्या जोरावर डव्हचे रूपांतर ब्यूटी बारमधून जगातील सर्वाधिक लोकप्रिय सौंदर्यप्रसाधन ब्रॅण्ड्समधील एकात झाले.

स्त्रिया या कायम आमच्यासाठी प्रेरणास्रोत राहिल्या आहेत आणि सुरुवातीपासून आम्ही स्त्रियांना अधिक श्रेष्ठ दर्जाची केअर उत्पादने पुरवण्यास तसेच आमच्या जाहिरातींच्या माध्यमातून खऱ्या सौंदर्याचे समर्थन करण्यास पूर्णपणे वचनबद्ध होतोसौंदर्य हे प्रत्येकासाठी आहे यावर डव्हचा विश्वास आहेसौंदर्य हा आत्मविश्वासाचा स्रोत असला पाहिजेचिंतेचा नव्हेसगळीकडील स्त्रियांना त्यांच्या दिसण्याशी सकारात्मक नाते विकसित करण्यास तसेच त्यांच्या सौंदर्याची संभाव्यता आजमावून बघण्यास प्रेरणा देणे हे डव्हचे काम आहे.

आपल्या कामातून सौंदर्याची संकुचित व्याख्या व्यापक करण्यासाठी डव्ह ६० वर्षांपासून बांधील आहे. ‘डव्ह रीअल ब्यूटी प्लेज’ खालील बाबींसाठी वचनबद्ध आहे:

स्त्रियांचे चित्रण प्रामाणिकपणावैविध्य आणि आदर ठेवून करणेआम्ही विविध वयांच्याआकारमानांच्यावंशांच्याहेअर कलर्सच्याप्रकार व शैलींच्या स्त्रियांचे चित्रण करतो.

स्त्रिया वास्तव आयुष्यात जशा आहेत तसेच आम्ही त्यांचे चित्रण करणेयामध्ये डिजिटल विपर्यासांचे प्रमाण शून्य असते आणि सगळ्या प्रतिमा यात चित्रीत केलेल्या स्त्रियांनी मंजुरी दिलेल्या असतात

जगातील सर्वांत मोठ्या आत्मसन्मान शिक्षण पुरवणाऱ्या डव्ह सेल्फ-एस्टीम प्रोजेक्टच्या माध्यमातून तरुणांना आत्मविश्वास व आत्मसन्मान उभारण्यासाठी मदत करणे.

 

डव्ह आत्मसन्मान प्रकल्पाविषयी

कोणत्याच तरुण व्यक्तीला त्यांच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यापासून थांबवले जाऊ नये असे डव्हला मनापासून वाटतेमात्रशरीराबद्दलच्या आत्मविश्वासाचा अभाव आणि आपल्या दिसण्याबद्दलची चिंता यांमुळे तरुणांना त्यांचे सर्वोत्तम व्यक्तिमत्व गाठता येत नाहीत्यांच्या आरोग्यावरनातेसंबंधांवर व शिक्षणातील कामगिरीवरही परिणाम होतो.

सौंदर्याचा सकारात्मक अनुभव प्रत्येक स्त्री आणि मुलीला आला पाहिजे या दृष्टिकोनातून डव्ह सेल्फ-एस्टीम प्रोजेक्ट आकाराला आलामानसशास्त्रज्ञआरोग्य आणि शरीर प्रतिमा यांच्या क्षेत्रातील आघाडीच्या तज्ज्ञांशी आम्ही भागीदारी करतो आणि पुरावाधारित संसाधनांचा एक कार्यक्रम तयार करतोयामध्ये तरुणांना निकोप मैत्री जोडण्यासाठीशारीरिक प्रतिमेबाबतच्या समस्यांवर मात करण्यासाठी व आपले सर्वोत्तम व्यक्तिमत्व गाठण्यासाठी सल्ला पुरवण्याचा समावेश होतो

२००४ पासून डव्ह सेल्फ-एस्टीम प्रोजेक्टने १५० देशांतील ६९ दशलक्ष तरुणांना शरीराबद्दल आत्मविश्वास कमावण्याचे शिक्षण दिले आहे आणि अशा प्रकारचे आत्मसन्मानाचे शिक्षण देणारा हा सर्वांत मोठा प्रकल्प ठरला आहेअर्थात आम्ही येथे थांबणार नाहीआमचे जागतिक उद्दिष्ट २००४ ते २०३० या काळात जगातील अब्ज तरुणांपैकी एक चतुर्थांश जणांना सहाय्य करणे हे आहे.

 

हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडविषयी

हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (एचयूएलही भारतातील सर्वांत मोठी फास्ट-मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स कंपनी असूनभारतात या कंपनीला ८५ वर्षांहून अधिक मोठा वारसा आहेकोणत्याही दिवशी दहा भारतीय घरांतील नऊ घरांमध्ये चांगल्या अनुभवासाठीचांगले दिसण्यासाठी आणि आयुष्याचा अधिक उपभोग घेण्यासाठी आमची उत्पादने वापरली जात असतातयाद्वारे आम्हाला उज्ज्वल भवितव्य घडवण्याची अनोखी संधी प्राप्त होतेअधिक माहितीसाठी भेट द्याwww.hul.co.in

 

No comments: