Saturday, January 30, 2021

महात्मा गांधींचे विचारच देशाला तारतील.-धनंजय जुन्नरकर

 


                                             *दहिसर विधानसभेत महात्मा गांधी पुण्यतिथी साजरी*

मुंबई- प्रतिनिधी
मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप ह्यांच्या आदेशानुसार 30 जानेवारी रोजी महात्मा गांधी ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम अतिशय गांभीर्यपूर्वक पार पडला. 11 वाजता सर्व उपस्थितांनी 2 मिनिटे मौन ठेवले. गांधीजींना प्रिय असलेली सुरेल भजने सर्वांनी  ऐकली.
दहिसर विधानसभा क्षेत्रात प्रभाग 1,7 आणि 8 आयोजित महात्मा गांधी पुण्यतिथी  मंडपेश्वर रोड येथील अंकुर इमारती जवळ 
अतिशय गंभीर वातावरणात पार पडली. 

        

मुंबई काँग्रेस सचिव धनंजय जुन्नरकर ह्यांनी आपल्या भाषणात महात्मा गांधी ह्यांचे विचारच देशाला  तारतील व त्याच विचारांची सध्या प्रचंड  गरज आहे असे प्रतिपादन केले.
गोडसे चा अविचार समाजातून  उत्तम नैतिक शिकवणुकी द्वारे नष्ट करावा लागेल, तसेच गांधींच्या अंत्योदय विचाराचा पुरस्कार करण्या साठी दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे व केंद्र सरकारने तात्काळ 3 काळे कृषी कायदे रद्द करावे असे वकत्व केले.
तिलोत्तमा वैद्य ह्यांनी प्रसंगोचित भाषण केले, तर ब्लॉक अध्यक्ष लौकिक सुत्राळे ह्यांनी सगळ्यांचे आभार मानले.
कार्यक्रमासाठी प्रभाग 1 चे ब्लॉक अध्यक्ष लॉयल फ्रान्सिस , 7 चे ब्लॉक अध्यक्ष नित्यानंद शेट्टी , रवींद्र केणी, प्रमिथा जॉन, आफ्रिन खान, राजेश मौर्य आणि इतर वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
३० जानेवारी १९४८ साली नथुराम गोडसे याने महात्मा गांधी यांची गोळ्या घालून हत्या केली होती. आज गांधीजींची ७२वी पुण्यतिथी आहे.

No comments: