अमेरिकेच्या टेस्ला कंपनीसाठी महाराष्ट्राचा लाल गालिचा

मुंबई, दि. 23 पर्यावरण पूरक इलेक्ट्रीक वाहन निर्मिती क्षेत्रातील अमेरिकेतील आघाडीची टेस्ला कंपनीने महाराष्ट्रात प्रकल्प सुरू करावा, यासाठी महाविकास आघाडी सरकारने प्रयत्न सुरू केले असून याच अनुषंगाने कंपनीच्या प्रतिनिधींसोबत उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यटन तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी वेबिनारदवारे चर्चा केली.


राज्य शासनाने 2019 मध्ये नवीन औदयोगिक धोरण केले असून यामध्ये इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे येत्या काळात इलेक्ट्रिक वाहननिर्मिती कंपन्यांना उत्पादनासाठी महाराष्ट्रात मोठी संधी आहे. याच अनुषंगाने टेस्ला कंपनीने महाराष्ट्रात आपला प्रकल्प सुरू करावा, असे राज्य शासनाच्यावतीने उद्योगमंत्री आणि पर्यावरण मंत्र्यांनी यावेळी सांगितले. टेस्ला कंपनीला प्रकल्प सुरू करण्यासाठी विशेष सुविधांसह प्रोत्साहनपर सवलत दिल्या जातील, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले..


टेस्ला कंपनीने वाहन निर्मिती प्रकल्प व संशोधन आणि विकास (आर अँड डी) केद्र राज्यात सुरू करावे, त्यांना आवश्यक त्या पायाभूत सुविधा राज्य शासन पुरविल, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी दिली.


प्रदूषण कमी करण्यासाठी पर्यावरण पूरक वाहन निर्मितीला चालना देण्याचे राज्य शासनचा मानस आहे. त्यादृष्टीने राज्य शासनाने काही धोरणं निश्चित केल आहे येत्या काळात इलेक्ट्रीक वाहनांमुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. विशेषतः मुंबईत इलेक्ट्रिक वाहनांचा अधिक वापर झाल्यास ते पर्यावरणाच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.


दरम्यान, टेस्ला कंपनीच्यावतीने रोहन पटेल( ग्लोबल डायरेक्टर, टेस्ला), डॉ. सचिन सेठ हे चर्चेत सहभागी झाले होते. टेस्लासाठी महाराष्ट्रात मोठी बाजारपेठ असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी नगर विकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव


वेणुगोपाल रेड्डी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अन्बलगन, उद्योग विभागाचे


विकास आयुक्त हर्षदीप कांबळे आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

Tamasha World HD premier on &pictures HD

Here are 5 age defying love stories on Hindi television that proved that love has no age-bar.

Powerful, Soulful & Artistic #SMWMumbai