Friday, June 19, 2020

‘युअर ट्रेडीशन्स अवर पिकल्स’ कॅम्पेनची मदर्स रेसिपीकडून सुरुवात

भारत18 जून, 2020 लोणची तयार करण्याची प्रक्रिया नक्कीच नॉस्टेलजिक असते. मदर्स रेसिपी हा भारतातील एक अग्रगण्य एफएमसीजी ब्रँड असून त्यांनी अलीकडेच एका सोशल मीडिया कॅम्पेनची सुरुवात केली. लोणची हंगामात ग्राहकांना भावनिक साद घालण्याच्या अनुषंगाने कॅम्पेनची सुरुवात करण्यात आली. आपल्या देशात असा एकही कोपरा आढळणार नाही, जिथे लोणचे तयार करण्याची परंपरा नसेल. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात आपल्या घरगुती लोणच्याशी संबंधी आठवणी नक्कीच असतात. मग आजीच्या हातची चव असो किंवा घराच्या गच्चीवर लोणच्याच्या बरणीत मुरत घातलेला आनंद असो.. प्रत्येक व्यक्तीच्या लोणच्याशी संबंधी निरनिराळ्या आठवणी असतात. मदर्स रेसिपी पिकल्स यांच्या कॅम्पेनच्या निमित्ताने घराघरात लोणच्याच्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळणार आहे.
घरात निरनिराळी लोणची तयार करण्याची प्रक्रिया म्हणजे एक वार्षिक उत्सवच असतो. बाजारातून चांगल्या प्रतीची फळं निवडण्यापासून ते पारंपरीक पाककृतीनुसार मसाल्यांचे योग्य प्रमाण मिसळण्यापर्यंत किंवा नियमित लोणच्याला उन्हं दाखवण्याच्या प्रक्रियेत कुटुंबातील बऱ्याच सदस्यांचा समावेश असतो. आंबट कैऱ्या, चटकदार लिंबू आणि मिरची हे लोणच्याचे काही सर्वाधिक लोकप्रिय प्रकार मानले जातात. लोणचे तयार करण्याचा राव म्हणजे भावनिक आणि शारिरीक पातळ्यांवरील एक प्रवासच असतो! आजच्या काळात आपण सगळेच घडाळ्याच्या काट्यावर पळत आहोत. प्रत्येकाचे जीवन धकाधकीचे झाले असताना तयार उत्पादनांवर विसंबून राहण्याचे प्रमाण वाढलेले दिसते. मात्र चव आणि दर्जाबाबत कोणतीच तडजोड चालत नाही. ग्राहकांचे काम हलके करणे आणि त्यांना जुन्या पारंपरीक चवीशी मिळताजुळता स्वाद उपलब्ध करून देणे हे या कॅम्पेनचे उद्दिष्ट आहे.  
या कॅम्पेनविषयी बोलताना मदर्स रेसिपी – देसाई फुड्सच्या कार्यकारी संचालिका संजना देसाई म्हणाल्या की, “आम्ही ‘युअर ट्रेडीशन्स अवर पिकल्स’ या कॅम्पेनची सुरुवात केली आहे. स्वयंपाकाशी संबंधित आमच्या परंपरेला विषाणूंचा संसर्ग होण्याचा धोका नाही हा विचार डोक्यात आला तिथेच कॅम्पेनची कल्पना सुचली. तर मग यंदाच्या उन्हाळ्यात आपण स्वादाच्या परंपरेत खंड तरी कशासाठी पाडायचा? आमच्या प्रत्येक कॅम्पेनसोबत ग्राहकांच्या भावनांची तार छेडण्याचा तसेच त्यांना आठवणींच्या खजिन्याकडे नेण्याचा प्रयत्न असतो. आमच्याकडे प्रत्येक चवीसाठी 50 हून अधिक लोणच्यांचे प्रकार उपलब्ध आहेत. आम्ही कोणतेही कृत्रिम प्रिझरवेटिव्स, कृत्रिम रंग वापरत नाही. मोठ्या प्रेमाने पारंपरिक पद्धतीने लोणचे तयार करतो. पेश है वही घर वाला स्वाद, वही समर वाला स्वाद’ (‘तर सादर आहे घरची तीच चव, उन्हाळ्यातला तोच स्वाद’)
मदर्स रेसिपी उत्पादने त्यांच्या वेबसाईटवर www.mothersrecipe.com उपलब्ध आहेत. अलीकडेच कंपनीने स्वीगी आणि बिग बास्केट यांसारख्या अन्नपदार्थांची डिलिव्हरी देणाऱ्या कंपन्यांसमवेत आपल्या पोर्टफोलियोमधील उत्पादने उपलब्ध करून दिली आहेत. कंपनीकडून आवश्यक त्या खबरदारीच्या
 उपाययोजना राबवण्यात येत असल्याची खातरजमा करून घेतली जाते आहे. हँड सॅनिटायजर्स, फेस मास्क, हँड ग्लोव्हज, समाजात वावरताना शारिरीक अंतर राखणे आणि कमीत-कमी मानवी संपर्क पिक-अप आणि डिलिव्हरी प्रक्रियेदरम्यान पाळण्यात येतो.     
कॅम्पेन क्रेडिट्स :
  • ब्रँडचे नावमदर्स रेसिपी
  • कॅम्पेनचे नावयुअर ट्रेडीशन्स अवर पिकल्स
  • कॅम्पेन प्रकारडिजीटल
  • क्रिएटीव्ह एजन्सीट्रीटन कम्युनिकेशन्स
  • डिजीटल एजन्सीसोशल पंगा
  • कॅम्पेन व्हिडियो लिंक (एफबी):https://www.facebook.com/imissmymothersrecipe/videos/303362547363914/

No comments: