Wednesday, June 17, 2020

जीडब्ल्यूएमने केला महाराष्ट्र सरकारबरोबर सामंजस्य ठराव, भारताप्रती असलेली वचनबद्धता केली दृढ

१ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक टप्प्याटप्प्याने करणारयामुळे ३०००हून अधिक लोकांसाठी रोजगार निर्माण होणार
 जून २०२०आपल्या भारतातील प्रवासामध्ये एक मोठा पल्ला पार करत जीडब्ल्यूएमने आज महाराष्ट्र सरकारबरोबर सामंजस्य ठरावावर (एमओयूस्वाक्षरी केल्याचे जाहीर केलेमहाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्रीउद्धव ठाकरे आणि भारतातील चीनचे राजदूत श्रीसुन वीडाँग यांच्या उपस्थितीत आज एमओयूवर स्वाक्ष-या करण्यात आल्यामहाराष्ट्रातील तळेगावमध्ये एका अतिप्रगत वाहन उत्पादन कारखान्यासाठी गुंतवणूक करणार असल्याचे या एमओयूद्वारे अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेहा कारखाना जागतिक दर्जाच्या नवीनतम तंत्रज्ञानाने सुसज्ज असेलत्याचबरोबर बेंगळुरू येथे संशोधन व विकार (आरअँडडीकेंद्र सुरू केले जाणार आहेयामुळे ३०००हून अधिक लोकांसाठी टप्प्याटप्प्याने रोजगार निर्माण होणार आहे
जीडब्ल्यूएमच्या भारतीय उपकंपनीचे अध्यक्ष श्रीजेम्स यांग आणि व्यवस्थापकीय संचालक श्रीपार्कर शि तसेच भारतातील चीनचे राजदूत श्रीसन वीडाँग आणि महाराष्ट्र सरकारचे माननीय उद्योगमंत्री श्रीसुभाष देसाई यांच्यातील व्हर्च्युअल बैठकीद्वारे करारावर स्वाक्ष-या करण्याचा समारंभ झालामहाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्रीही या व्हर्च्युअल समारंभाला उपस्थित होतेतळेगावमध्ये एक पूर्णपणे आधुनिक आणि जागतिक दर्जाचा उत्पादन कारखाना उभारण्याची अधिकृत घोषणा यावेळी करण्यात आली.
श्रीपार्कर शि या संस्मरणीय ठरावाबद्दल म्हणाले, “आम्हाला संपूर्ण पाठिंबा दिल्याबद्दल तसेच एक दीर्घकालीन व परस्परलाभाचा सहयोग प्रस्थापित करण्यासाठी सहाय्य पुरवल्याबद्दल आम्ही महाराष्ट्र सरकारचे आभारी आहोतहा सहयोग दोहोंसाठी उत्तम व्यावसायिक विधान ठरेल, अशी आशाही आम्ही व्यक्त करतोतळेगावमधील हा कारखाना मोठ्या प्रमाणावर स्वयंचलित असेलयामध्ये उत्पादनाच्या अनेक प्रक्रियांमध्ये प्रगत रोबोटिक तंत्रज्ञानाचे एकात्मीकरण केले जाईलएकंदर भारतात १ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोतजागतिक दर्जाची इंटेलिजंट व अव्वल उत्पादनांच्या निर्मितीसाठीसंशोधन व विकास केंद्रासाठीपुरवठा साखळी उभारण्यासाठी आणि टप्प्याटप्प्याने ३०००हून अधिक रोजगार निर्माण करण्यासाठी ही गुंतवणूक वापरली जाईल.”
महाराष्ट्रातील तळेगाव इंडस्ट्रियल पार्कसारख्या मोक्याच्या ठिकाणी हा कारखाना ३०० एकर जागेत उभारला जाणार आहेहे स्थळ एक्स्प्रेस हायवेच्या जवळ आहेपुणे शहरापासून ही जागा ४५ किलोमीटर अंतरावर आहेतर मुंबई पोर्टपासून १०० किलोमीटर अंतरावर आहे.
अलीकडेचचालू वर्षाच्या जानेवारी महिन्यातजीडब्ल्यूएमने जीएमकडून या प्लांटच्या संपादनासाठी करार केलाकारखान्यात लॉजिस्टिक्स वितरण केंद्रप्रकल्प व्यवस्थापन इमारतप्रशासकीय कार्यालयाची इमारत आणि सार्वजनिक सुविधा केंद्र आहे.
भारतातील वाहन उद्योगाच्या यशोगाथेत योगदान देण्यासाठी जीडब्ल्यूएम पूर्णपणे वचनबद्ध आहेत्याचप्रमाणे सध्याचे साथीचे आव्हान आणि त्याचे दुष्परिणाम यांच्याशी लढण्याकरता भारतासोबत जबाबदारीने उभी आहेनुकत्याच हाती घेतलेल्या एका उपक्रमाद्वारे जीडब्ल्यूएमने पुण्यातील विविध भागांमध्ये वैयक्तिक स्वच्छतेची साधने व कोरड्या खाद्यपदार्थांची किट्स वितरित केलीपुणे शहरातील गरजू लोक व स्थलांतरित कामगारांना मदत व भावनिक पाठिंबा देण्यासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून जीडब्ल्यूएम प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे.
जीडब्ल्यूएम विषयी:

१९८४ मध्ये स्थापन झालेली जीडब्ल्यूएम ही जागतिक एसयूव्ही उत्पादक कंपनी आहेसध्या कंपनीकडे हॅव्हलजीडब्ल्यूएम ईव्ही आणि जीडब्ल्यूएम पिकअप ब्रॅण्ड्सची मालकी आहेकंपनीच्या उत्पादनांमध्ये पारंपरिक इंधनांवर चालणा-यापूर्णपणे इलेक्ट्रिकहायब्रिड व अन्य ऊर्जा प्रारूपांचा समावेश होतोयाशिवाय जीडब्ल्यूएम आता हायड्रोजन इंधनांवर चालणा-या वाहनांच्या विकासासाठीही सक्रियपणे काम करत आहेआजघडीला जीडब्ल्यूएमकडे जगभरात ९१हून अधिक उपकंपन्या आहेतभारतअमेरिकाजर्मनीपानदक्षिण कोरियाचीन व ऑस्ट्रिया अशा ७ देशांमध्ये १० संशोधन व विकास केंद्रे आहेतकंपनीचे १४ जागतिक दर्जाचे उत्पादन कारखाने आहेत.

No comments: