Friday, June 12, 2020

*बार कौन्सिल ऑफ इंडियाचे विधी परीक्षा पुढील वर्षी घेण्याचे पत्रक फेटाळण्यात यावे* - मुंबई काँग्रेस

मुंबई-
*विधी विभागाच्या प्रथम आणि द्वितीय वर्षांच्या विद्यार्थ्यांना ह्या वर्षी प्रमोट करून त्यांच्या सदर परीक्षा पुढील वर्षी घेण्यात याव्यात व त्या पास झाल्या शिवाय पदवी देण्यात येऊ नये असे परिपत्रक बार कॉन्सील ऑफ इंडिया ने काढले आहे. त्या विरोधात विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष असून सदर परीक्षा रद्द करणे बाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुंबई विभागीय काँग्रेस चे सचिव धनंजय जुन्नरकर ह्यांनी निवेदन दिले आहे*.

राज्यातील विद्यापीठांमधील पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम सत्र परीक्षा न घेता सरासरी गुणांच्या आधारे मूल्यांकन करण्याचे सरकारने जाहीर केले आहे.

 या पार्श्वभूमीवर आता बार कौन्सिल ऑफ इंडियाने विधीच्या तीन व पाच वर्षे अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यावी, असे परिपत्रक काढले आहे.

निरनिराळी विद्यापीठे त्यांच्या मनाने सूचना देत असल्याने प्रचंड गोंधळाचे वातावरण आहे .

धनंजय जुन्नरकर ह्यांच्या मते  कोरोना मुळे आज महाराष्ट्राची स्थिती अतिशय गंभीर झालेली आहे. 3 महिने लॉक डाऊन नंतर ही केवळ मुंबईत 50,000 कोरोना रुग्ण तयार झालेले आहेत. आता पुढील 4 महिने पावसाळ्यात काय स्थिती असेल ह्याची कुणी कल्पना करू शकत नाही.

विधी विभागाच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षी चा अभ्यास करणे अवघड होणार आहे.

 महाविद्यालयात विद्यार्थी जायला सुरुवात होईल अशी कुणीही कल्पना करू शकत नाही.

पुढील वर्षाचा अभ्यास करणे हे मोठे दिव्य असताना मागील वर्षाच्या विषयांची परीक्षा देणे कसे शक्य होणार?

*2 वर्षांचा अभ्यास विद्यार्थी एकाच वर्षी कसा करणार*?

कोणताही सारासार विचार न करता BCI ने सदर परिपत्रक काढले आहे.

*विद्यार्थ्यांना कुणीही विचारात घेत नसून मनमानेल तसे कोणतेही आदेश पाळले जाणार नाही*.

विद्यार्थी प्रतिनिधी शी चर्चा केली जावी. कोरोना च्या महामारीत जीवा पेक्षा परीक्षा मोठी नाही.

सदर बाबतीत आदरणीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या बाजूने सहानुभूती पूर्ण निर्णय घेऊन प्रमोट केलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यायला लावू नये.
होम असाईनमेंट मध्ये विषयावर प्रोजेक्ट देऊन त्यावर मूल्यांकन करता येईल.

म्हणजे सदर विद्यार्थी पुढील वर्षीच्या अभ्यासाला तरी लागतील.

राज्यपाल आणि बार कौन्सिल ऑफ इंडिया ह्यांच्या पत्रामुळे विद्यार्थी निराश नाराज आणि संतप्त असून पालक हतबल झालेले आहेत.

No comments: