मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणारः सुभाष देसाई
मुंबई, दि. १० कोरोना आपत्तामुळे मंदावलेल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा चालना देण्यासाठी उद्योग विभागाने कंबर कसली आहे. कोरोना संकटाच्या आर्थिक दुष्परिणामांना तोंड देण्यासाठी पुढारलेले देशसुद्धा वेगवेगळ्या योजना आखत आहेत. या घडामोडींमुळे गुंतवणुकीसाठी पर्यायी देशांचा विचार होऊ लागला आहे. भारतालाही विदेश गुंतवणुकीसाठी समर्थ पर्याय म्हणून पाहिले जात आहे.
राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी विदेश गुंतवणुकीचे व्यवस्थापन व विस्तारासाठी एक विशेष कृतीदल नियुक्त केले असून यातील ज्येष्ठ अधिकारी गुंतवणुकदारांशी वाटाघाटी करीत आहेत. अमेरिका, इंग्लड, जर्मनी, जपान, दक्षिण कोरिया, तैवानसह अन्य देशांच्या गुंतवणुकदारांचे प्रतिनिधी सध्या राज्य सरकारच्या प्रतिनिधींसह चर्चा करीत आहेत. गुंतवणूक प्रस्ताव वेगाने अंमलात यावेत व महाराष्ट्राचे आकर्षण वाढावे, यासाठी तपशीलवार धोरण तयार करण्यात येत आहे. औद्योगिक सुरक्षेत कोणतीही तडजोड न करता अन्य प्रोत्साहने वाढवून गुंतवणूक आकर्षित करण्यावर भर देण्यात येत आहे. उद्योग विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अन्बलगन व उद्योग विभागाचे विकास आय़ुक्त हर्षदीप कांबळे यांचा कृतीदलात समावेश आहे.
No comments:
Post a Comment