शिक्षक दिना निमित्त अथर्व युनिव्हर्सिटी मुंबईतर्फे १०० आदर्श शिक्षकांचा सन्मान
मुंबई-अथर्व युनिव्हर्सिटी मुंबई व अथर्व फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आज दुपारी मालाड (पश्चिम) येथील
अथर्व युनिव्हर्सिटी, मुंबईच्या सभागृहात शिक्षक दिनाचे औचित्य साधत मुंबई,नवी मुंबई,मीरा भाईदर क्षेत्रातील १०० शिक्षकांना त्यांच्या नाविन्यपूर्ण कार्यासाठी, समर्पणासाठी आणि विद्यार्थ्यांच्या जीवनावर कायमस्वरूपी प्रभाव पाडण्यासाठी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले गेले.
हा कार्यक्रम अथर्व युनिव्हर्सिटी मुंबईचे संस्थापक आणि पाहिले कुलपती सुनील राणे यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली मुंबईतील १०० कर्तृत्ववान शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केला होता.यावेळी चारकोपचे स्थानिक आमदार योगेश सागर,कुलपती सुनील राणे,अथर्व फाउंडेशनच्या उपाध्यक्ष वर्षा राणे,कर्नल सुधीर राजे ,उद्योजक अशोक धामाणकर,भाजपा मुंबई शिक्षक आघाडीचे अध्यक्ष राजू बंडगर,डॉ.प्रवीण नेभाडे आदी मान्यवर मंचकावर उपस्थित होते.
यावेळी अथर्व युनिव्हर्सिटी,मुंबईचे कुलपती
सुनील राणे म्हणाले की,जागतिक पातळीवर स्पर्धा करणारा विद्यार्थी अथर्व कॉलेज मधून निर्माण होण्यासाठी आधुनिकतेची कास धरत येथे आधुनिक शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते. अमेझॉन कंपनींने मुंबईतून निवडलेला ६५ लाख वार्षिक पॅकेजचा एकमेव विद्यार्थी अथर्व कॉलेजचा होता.तसेच
अथर्वच्या ग्राउंड स्टेशनच्या नाविन्यपूर्ण विद्यार्थ्यांच्या पथकाने अथर्व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये आयआयटी मुंबईच्या प्रथम उपग्रहासाठी एक कार्यात्मक रिसीव्हिंग ग्राउंड स्टेशन स्थापित करण्यात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. अथर्व ग्राउंड स्टेशन हे प्रथमने पाठवलेला डेटा प्राप्त करणाऱ्या आणि त्यावर प्रक्रिया करणाऱ्या रिसीव्हिंग स्टेशनपैकी एक असल्याची माहिती त्यांनी दिली.
आमचे कॉलेज, ज्यामध्ये प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांसाठी ३१ परवानाधारक हॅम ऑपरेटर आहेत, हे मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत एचएफ हॅम कम्युनिकेशन सेटअप स्थापन करणारी पहिली संस्था आहे असे त्यांनी अभिमानाने सांगितले.या सेटअपमुळे आम्हाला हॅम बँडवर मुक्तपणे संवाद साधता येतो, जे नवोन्मेष, तांत्रिक उत्कृष्टता आणि प्रत्यक्ष शिक्षणाप्रती आमची वचनबद्धता दर्शवते अशी माहिती सुनील राणे यांनी दिली.
भविष्यात जगात आधुनिक शिक्षण मिळणारी संस्था असा आमच्या संस्थेचा नावलौकिक होईल.देशातील विद्यार्थ्यांसह,अमेरिका आणि इतर परदेशातील विद्यार्थी येथे प्रवेश घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी आमदार योगेश सागर म्हणाले की,आपला देश जगात महाशक्तीकडे वाटचाल करत असतांना त्यांना घडवण्याचे आणि त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्याचे काम शिक्षक करतात.शिक्षक निवृत्त झाला तरी,तो सतत कार्यरत असतो,विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचे काम शिक्षक करतात. मुंबईतील १०० कर्तुत्वान शिक्षकांचा सत्कार करण्याची संकल्पना राबवणारे सुनील राणे हे अथर्व युनिव्हर्सिटी,मुंबईचे पाहिले कुलपती आहे ही अभिमानाची बाब आहे.येत्या चार पाच वर्षांत कुलपती सुनील राणे यांच्या अथर्व युनिव्हर्सिटीत आधुनिक आणि दर्जेदार शिक्षण मिळतं असल्याने परदेशातील विद्यार्थी या शिक्षण संस्थेत प्रवेश घेतील असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदिका भार्गवी चिरमुले यांनी केले.
No comments:
Post a Comment