Wednesday, January 8, 2025

साहित्यसेवक वसंत तावडे स्मृती कथा स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा

By Manohar Kumbhejkar  

मुंबई-प्रबोधन गोरेगाव आणि साप्ताहिक मार्मिक आयोजित साहित्यसेवक वसंत तावडे स्मृती प्रबोधन- मार्मिक कथा स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा शनिवार दि,११ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता गोरेगाव पश्चिम,एस.व्ही.रोड जवाहर नगर हॉल येथे आयोजित केला आहे.नवशक्तिचे संपादक प्रकाश सावंत यांच्या हस्ते व शिवसेना नेते,प्रबोधन गोरेगावचे संस्थापक सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत होणार आहे.यावेळी डॉ.संजय उपाध्ये मन करा रे प्रसन्न सादर करणार आहे.


स्व. वसंत तावडे हे प्रबोधन गोरेगाव संस्थेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक धडाडीचे शिवसैनिक. अखेरच्या श्वासापर्यंत शिवसेना , शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधन गोरेगाव या तीन नावानी झपाटलेला . या संस्थेचा ते एक प्रमुख आधारस्तंभ होते. शिवसेनेच्या संपूर्ण इतिहासाची व कार्याची विविध वृत्तपात्रात /मासिकात छापून आलेली कात्रणे जमा करण्याचा त्यांना छंद होता. स्व. वसंत तावडे यांच्याकडे उत्तम वाचक आणि चांगला लेखक हे गुण असल्यामुळे त्यांनी *आपले वसंतश्री* हा दिवाळी अंक प्रकाशित करण्याचा उपक्रम अनेक वर्षे सातत्याने व यशस्वीपणे चालविला. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्याने व्याकरणशुद्ध मराठी लेखनासाठी  त्यांचा प्रचंड आग्रह होता.  त्यांच्या असामान्य योगदानाला विनम्र अभिवादन म्हणून यावर्षी पासून '*साहित्यसेवक वसंत तावडे स्मृती प्रबोधन-मार्मिक कथा स्पर्धा*' आयोजित करण्यात आली होती.


प्रबोधन गोरेगावचा उपनगरात आहे डंका


शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८०% समाजकारणाच्या विचारांच्या प्रेरणेतून सन १९७२ साली शिवसेना नेते व प्रबोधन गोरेगावचे संस्थापक सुभाष देसाई यांनी प्रबोधन गोरेगाव या संस्थेची स्थापना केली. ज्ञान, कला, सेवा या त्रिसूत्रीला न्याय देत आज या संस्थेने गोरेगाव आणि आजूबाजूच्या परिसरातील जनतेसाठी प्रबोधन डायलेसिस सेंटर , मीनाताई ठाकरे रक्तपेढी , प्रबोधनकार ठाकरे वाचनालय सह अभ्यासिका , जॉगर्सपार्क , ओझोन स्विमिंग पूल , प्रबोधन क्रीडाभवन असे समाज उपयोगी उपक्रम चालू केले आहेत. संस्थेला ५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त प्रबोधन संस्थेने ग्रामीण भागातील अर्धवट शिक्षण झालेल्या गरीब मुला मुलींना रोजगार मिळवण्यासाठी शिक्षणा सोबत तांत्रिक कौशल्य द्यावे याउद्देशाने रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्यात एमजीएल- प्रबोधन कौशल्य निकेतन हि संस्था २०२२ पासून सुरु केली. या संस्थेत नर्सिंग , आयटी, इलेक्ट्रिक , एसी , गॅस पाईपिंग , ब्युटीपार्लर , टेलरिंग , मोबाईल रिपेअर सुरु केले असून दरवर्षी साधारण ३२० विध्यार्थी प्रशिक्षित होणार आहेत.

No comments:

15th edition of Sunday Soul Sante, India's leading lifestyle and flea market.

S unday Soul Sante - Diwali Edition 2025 Celebrating 15 years, Sunday Soul Sante has grown from a flea market into a cultural movement, unit...