मुंबई(सांस्कृतिक - मनोरंजन प्रतिनिधी) : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'ऊन सावली' या चित्रपटाला प्रेक्षकांचं महाराष्ट्रभर भरभरून प्रेम मिळालं. कांद्या पोह्याच्या कार्यक्रमातून पार पडलेल्या लग्नात प्रेमाचा गंध कसा दरवळत जातो; सांगणाऱ्या या चित्रपटाचा १२ एप्रिल २०२४ रोजी 'अल्ट्रा झकास' मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे.
प्रणय आणि अन्वी त्यांच्या पालकांच्या आग्रहास्तव लग्नासाठी एकमेकांना भेटायला तयार होतात. प्रणयला पहिल्या भेटीतच अन्वी आवडली आहे, मात्र अन्वीची लग्न करण्याची इच्छा नाही. असं असतानाही त्यांचं लग्न होतं खरं, मात्र लग्नानंतर काय गोंधळ सुरू होतो ते चित्रपटात पहायला मिळणार आहे.
भूषण प्रधान आणि शिवानी सुर्वे यांच्यासह तिचा खऱ्या आयुष्यातील पती अजिंक्य ननावरे हे चित्रपटाचे प्रमुख कलाकार आहेत. याचबरोबर राज शरणागत, अंकित भोईर, विकास हांडे, श्वेता कामत आणि प्रिया तुळजापूरकर यांच्या चित्रपटात धमाकेदार भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन दिवाकर नाईक यांनी केले आहे.
“एक आशावादी आणि एक निरर्थक विचार सरणीचे दोन पात्र या चित्रपटात प्रेक्षकांना दिसणार आहेत. निरर्थक विचारातून एक आशेचं किरण तेवत ठेवलं तर आयुष्य सुंदर होतं. प्रेमाचा हा विलक्षण विचार मांडणारा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, अशी आम्हाला आशा आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री.सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.
नवनवीन चित्रपट पाहण्यासाठी :- https://www.ultrajhakaas.com/marathi-movies
प्रसिद्धी जनसंपर्क प्रमुख : राम कोंडीलकर,
राम पब्लिसिटी, मुंबई
संपर्क : मो. / व्हॉट्सअँप - ९८२१४९८६५८
इमेल : ramkondilkar.pr@gmail.com
Thanks for thiis
ReplyDelete