Monday, April 27, 2020

पोस्टाचे कर्मवीर Corona Warriors from Indian Postal Department


पोस्ट विभागाने लॉकडाऊन सुरु झाल्यापासून २३ मार्च ते २३ एप्रिल या महिन्याच्या कालावधीत नागरिकांसाठी अत्यावश्यक सेवा सुरु ठेवल्या आहेत.

नवी मुंबई रिजनच्या विभागाअंतर्गत, रायगड, पालघर, ठाणे, नवी मुंबई, नाशिक आणि मालेगाव
जिल्यात एकूण १५१४ पोस्ट ऑफिसेस सुरु ठेवण्यात आली आहेत आणि आवश्यक ते मनुष्यबळ, पोस्टाचे
व्यवहार करण्यासाठी पुरवण्यात आले आहे.

१. या कालावधीत नागरिकांना बचत खात्याच्या विविध योजना, इंडिया पोस्ट पेमेंट बँक च्या आधार आधारित
देय सेवांसारख्या विविध योजनांअंतर्गत, त्यांच्या बँक खात्यातून ८६,६९८ इतक्या लोकांना रु. १६४ करोड चे
वितरण करण्यात आले.
२. तसेच १४२९ इतक्या मनी ऑर्डर साठी रु. ३०.५७ लाख वितरित करण्यात आले.
लॉकडाउन च्या काळात घरबसल्या पोस्टमन आणि ग्रामीण डाकसेवकांनी घरोघरी जाऊन गरजू
ग्राहकांना मदत केली.
३. पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून औषधी उपकरणे, मास्क, सॅनिटायझर्स , पी पी पी किट्स, आणि औषधे यांचे
३५०० पार्सलचे बुकिंग तसेच १०,००० पत्रांचे वितरण करण्यात आले.
४. सामाजिक कल्याण म्हणून मजूर, स्थलांतरित, लोकांसाठी एक लाख रुपयांचे भोजन व राशनचे वेगवेगळ्या
भागात वाटप करण्यात आले.
५. तसेच रायगड, पालघर, नवी मुंबई, मालेगाव भागांतील पोस्टाच्या कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने, सामाजिक
बांधिलकी व माणुसकी जपण्यासाठी पैसे / वर्गणी गोळा करून रु. २.१६ लाख जमवले व त्यातुन गरजूंना जेवण
व इतर सामानाचे वाटप केले.
सुरक्षिततेसाठी मास्क, सॅनिटायझर्स व सोशल डिस्टंन्स पाळून सेवाभाव वृत्तीने पोस्टाचे कर्मचारी,
कोरोना -१९ च्या संकटकाळात नागरिकांना सुविधा पुरवत आहेत, आणि कित्येकांनी व्यक्तीश: वा सोशल
माध्यमांतून आमचे आभार मानले आहेत, असे शोभा मधाळे, पोस्टमास्तर जनरल, नवी मुंबई रिजन यांनी
सांगितले.

No comments:

15th edition of Sunday Soul Sante, India's leading lifestyle and flea market.

S unday Soul Sante - Diwali Edition 2025 Celebrating 15 years, Sunday Soul Sante has grown from a flea market into a cultural movement, unit...