प्रबोधन गोरेगाव' आणि 'साप्ताहिक मार्मिक' यांच्यातर्पेâ आयोजित साहित्यसेवक वसंत तावडे स्मृती विनोदी कथा स्पर्धेचा निकाल जाहीर
प्रबोधन-मार्मिक विनोदी कथा स्पर्धा २०२६चा निकाल जाहीर ‘मानकरी तातल्या’ला पहिला क्रमांक, ‘मानसी’ ठरली सर्वोत्तम लघुतम कथा! मुंबई : 'प्रबोधन गोरेगाव' आणि 'साप्ताहिक मार्मिक' यांच्यातर्पेâ आयोजित साहित्यसेवक वसंत तावडे स्मृती विनोदी कथा स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून सदाशिव पाटगावकर लिखित ‘मानकरी तातल्या’ ही कथा प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराची मानकरी ठरली आहे. त्याचवेळी, यंदा प्रथमच घेण्यात आलेल्या लघुतम कथा स्पर्धेत प्राजक्ता पांगारकर यांच्या ‘मानसी’ या कथेने प्रथम क्रमांक पटकावला आहे. विनोदी कथा स्पर्धेमध्ये वैशाली देवडीकर यांनी लिहिलेली ‘दाराआडचा चोर’ ही कथा दुसर्या क्रमांकाची मानकरी ठरली असून असून तृतीय क्रमांकाचा पुरस्कार अमित पंडित लिखित ‘गोष्ट एका पेनाची’ या कथेने पटकावला आहे. संध्या सामंत (कथेचे शीर्षक : गाव गर्दी गजाली) आणि डॉ. अविनाश भोंडवे (आनंदाची बातमी) यांच्या कथांना उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त झाला आहे. लघुतम कथा स्पर्धेत राधिका जोशी यांच्या हिशोब या कथेने दुसरा तर अशोक गोवंडे यांच्या नेव्हर लव्ह अ स्ट्रेंजर या कथेने तिसरा पुरस्कार पटकावला आहे. प्र...