*माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन*
*(पांडुरंग पाटील), कल्याण : दि. १५ जुलै* - श्री. अंबाबाई प्रतिष्ठान, पिसवली, कल्याण पूर्व विभागातील कोल्हापूर वासियांसाठी कार्यरत आहे. विविध सामाजिक कार्य करत असलेले हे प्रतिष्ठान प्रत्येक वर्षी श्री. मोरेश्वर भोईर (क.डों.म.पा.) माजी उपमहापौर, नगरसेवक यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असते. दि. १६ जुलै रोजी वाढदिवसाचे औचित्य साधून दि. १३ जुलै रोजी सकाळी १० वाजता आमदार सुलभाताई यांचेहस्ते दीप प्रज्वलन करून कार्यकामांची सुरुवात करण्यात आली.
प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. गिरीधर कुराडे साहेब, अध्यक्षा सौ. छायाताई कुराडे मॅडम, सचिव सौ. शीतल खाडे, सदस्य सौ. सविता पाटील, सौ. सुनिता यममे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
कल्याण पूर्वच्या आमदार सुलभाताई गायकवाड यांच्याहस्ते रक्तदात्यांना आकर्षक भेट वस्तू, ज्येष्ठ नागरिकांना छत्री व ईयता १ते १०वी. पर्यंतच्या गुणवंत विध्यार्थीना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. तसेच बारावी आणि पदवीधर, कला, क्रीडा, मनोरंजन, शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा अशा विविध परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौवर आणि सत्कार करण्यात आला.
यावेळी आ. सुलभाताईंनी आपल्या भाषणातून श्री. अंबाबाई प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यकामांचे कौतुक केले व म्हणाल्या महिलांनी पुढाकार घेऊन स्वताच्या कामातून वेळ काढून हे कार्यक्रम राबविणे हे धैर्याचे काम आहे आणि ते ह्या महिलांनी चोख बजावले आहे. महिलानां आपल्या सुरक्षेबाबत काळजी घेत सर्व कार्य करण्याचे मार्गदर्शन केले तसेच सध्या नाव-नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी जास्त वेळ मोबाईलवर उपयुक्त नसलेल्या गोष्टींकडे लक्ष देऊ नये योग्य असेल तेच आत्मसात करावे आपले गुणवत्तेकडे लक्ष केंद्रित करावे असे विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्तेचे मार्गदर्शन केले.
आजरा अर्बन को.ऑप. बँक शाखा कल्याणचे मॅनेजर वैभव मुरकुटे साहेब व प्लाझ्मा ब्लड बँकचे एस एम डब्ल्यू निमसे सर यांच्या उपस्थितीसह कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी सूत्रसंचालन करणारे भारत जाधव, संदीप सावेकर, संदीप चोथे, आप्पा पाटील, आप्पा सावंत, दीपक कळविकट्टे, अनिल गोडसे, मधुकर मोहिते, राजकुमार पाटील, प्रकाश लांडे, मोहन कातकर, संतोष कातकर, अमोल जाधव, परशुराम कुट्रे, समीर कुराडे, अशोक मोरे, रमेश सावंत व राजेंद्र माडभगत मान्यवरांचे तसेच श्री. अंबाबाई प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांचे व सहकार्यांचे सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment