Posts

Showing posts with the label Industry Minister

महाराष्ट्र कामगार ब्युरोचे कामगार संघटनांकडून स्वागत , उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी घेतला आढावा

दि. २० भांडवली व पायाभूत सुविधांबरोबरच कामगार हा घटक उद्योग विश्वाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. भूमिपुत्रांना संधी देताना उद्योग विश्वाला कुशल-अकुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी कामगारवर्गाची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र कामगार ब्युरो ही संकल्पना साकारली जात आहे. आज कामगार संघटनांकडून याचे उस्फुर्त स्वागत करण्यात आले.    उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आज कामगार ब्यूरोसंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आज कामगार संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, आमदार भाई जगताप, विनोद घोसाळकर, जयप्रकाश छाजेड, शिवाजीराव गटकळ, उद्योग विभागाचे सचिव वेणुगोपाल रेड्डी, हर्षदीप कांबळे आदी उपस्थित होते.  सुभाष देसाई म्हणाले की, कोरोनाचा अर्थचक्रावर होणार परिणाम किती काळ राहील हे सांगता येत नाही. परंतु महाराष्ट्र शासानाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी पा...

राज्यात आतापर्यंत ५२ हजार उद्योग सरू औद्योगिकदृष्ट्या महाराष्ट्र सावरतोय: सुभाष देसाई

मुंबई, दि. १९  सध्या कोरोनामुक्त झालेल्या ग्रीन झोनमध्ये पूर्ण क्षमतेने उद्योग सुरू झाले आहेत. आतापर्यंत ७० हजार परवाने दिले असून त्यापैकी ५२ हजारांहून अधिक कारखाने सुरू झाले आहेत. यात साडेबारा लाख कामगार रुजू झाले आहेत. याशिवाय रेड झोनमधील अत्यावश्यक सेवा, निर्यात प्रधान उद्योग, संरक्षण दलासाठी लागणारे साहित्य- सामुग्री, सुटे भाग निर्मिती करणारे कारखाने, सिप्झ, डायमंड आदी क्षेत्रातील उद्योगांनाही उत्पादनासाठी परवानगी दिलेली आहे. परंतु रेड झोनमधील इतर उद्योगांवरील निर्बंध कायम ठेवले जाणार आहेत. एकूणच महाराष्ट्र राज्य औद्योगिकदृष्ट्या सावरतंय.  अशा परिस्थितीत सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे केले. वॉटर बॉटल असोशिएनच्यावतीने आयोजित वेबिनारमध्ये श्री. देसाई बोलत होते. यावेळी संघटनेचे राज्यभरातील पदाधिकारी सहभागी उपस्थित होते. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या पॅकेजमधून लघु, मध्यम उद्योगांना विनातारण कर्ज, पीएफमध्ये दिलासा देण्यात आला आहे. या पॅकेजचा लघु उद्योजकांन लाभ घ्यावा. राज्य सरकार देखील लघु उद्योगांना सवलती देत आहे. विजे...

उद्योग क्षेत्रातील नव्या संधीचा मराठी तरुणांनी फायदा घ्यावा : सुभाष देसाई

संकटासोबत  संधी निर्माण होते. कोरोना संकटामुळे उद्योग क्षेत्रांत अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. या संधीचा मराठी तरुणांनी फायदा घ्यावा, याकामी महाराष्ट्र सरकार आपल्याला पाठिशी उभे आहे. मराठमोळ्या हिमतीमुळेच कोरोनाच्या संकटावर आपण मात करून पुढे जावू, असा विश्वास उद्योग मंत्री सुभाष  देसाई यांनी आज येथे व्यक्त केला. ‘ऑल इंडिया सारस्वत कल्चरलर’ संघटनेच्या आयोजित ‘उद्योग क्षेत्रापुढील आव्हाने’ या विषयावरील वेबिनारमध्ये श्री. देसाई बोलत होते. यावेळी संघटनेचे अजित गुंजीकर, किशोर मासूरकर, नरेंद्र वझे, स्मिती गवाणकर आदी उपस्थित होते. सध्या संपूर्ण जग एका वेगळ्या संकटाला तोंड देत आहे. करोनोच्या महामारीमुळे पुढे काय होणार, असा प्रश्न सर्वांना भेडसावत आहे. परंतु या संकटावर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासन व उद्योग विभाग सज्ज झाला आहे. संकटासोबत संधी मिळते हे हेरून उद्योग विभागाने विविध धोरणं आणि योजना आखल्या आहेत. त्याचा मराठी माणसांनी फायदा घ्यावा व महाराष्ट्राला औद्योगिकदृष्ट्या वेगळ्या उंचीवर नेण्यास सहकार्य करावे, असे आवाहन श्री. देसाई यांनी केले.  कोरोनामुळे अनेक कंप...

राज्यात २५ हजार कंपन्यांचे उत्पादन सुरू, सहा लाख कामगार रुजू : उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती

मुंबई, दि. ११ कोरोना संकटामुळे जगभरातील उद्योग, व्यापार ठप्प आहेत. राज्यावरदेखील याचा विपरित परिणाम झाला  आहे. असे असले तरी उद्योग विभागाने ठोस पावलं उचलल्याने उद्योग क्षेत्र पूर्वपदावर येत आहे. रेड झोन वगळता सध्या राज्यात ५७,७४५ उद्योगांना परवाने दिले असून २५ हजार कंपन्यांनी उत्पादन सुरू केले आहे. त्यामध्ये सुमारे साडेसहा लाख कामगार काम करत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात ९ हजार १४७ कारखान्यांना परवाने दिले आहेत. त्यापैकी ५७७४ कंपन्यांनी उत्पादन सुरू केले आहे.  मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स,  इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर, पुणेच्यावतीने आयोजित बेवनारमध्ये आज उद्योगमंत्री सुभाष देसाई ही माहिती दिली.  श्री. देसाई म्हणाले की, मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड हा भाग रेड झोनमध्ये आहे. येथील उद्योग सुरू करण्याची मागणी होत आहे. परंतु मुख्यमंत्र्यांनी मे अखेर महाराष्ट्र ग्रीन झोन करायचा संकल्प केला आहे. त्यामुळे तोपर्यंत सर्वांनी सहकार्य करावे. आपली पहिली लढाई कोरोनासोबत आहेत. त्यामुळे थोडी घाई करू नये. वीज बिलात सवलत  स्थिर वीज बिलाबाबत उर्जामंत्र्यांसोबत बैठक घेतली ...

विदेशी गुंतवणुकदारांसाठी विशेष कृतीदलाची स्थापना

मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणारः सुभाष देसाई मुंबई, दि. १० कोरोना आपत्तामुळे मंदावलेल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा चालना देण्यासाठी उद्योग विभागाने कंबर कसली आहे. कोरोना संकटाच्या आर्थिक दुष्परिणामांना तोंड देण्यासाठी पुढारलेले देशसुद्धा वेगवेगळ्या योजना आखत आहेत. या घडामोडींमुळे गुंतवणुकीसाठी पर्यायी देशांचा विचार होऊ लागला आहे. भारतालाही विदेश गुंतवणुकीसाठी समर्थ पर्याय म्हणून पाहिले जात आहे. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी विदेश गुंतवणुकीचे व्यवस्थापन व विस्तारासाठी एक विशेष कृतीदल नियुक्त केले असून यातील ज्येष्ठ अधिकारी गुंतवणुकदारांशी वाटाघाटी करीत आहेत. अमेरिका, इंग्लड, जर्मनी, जपान, दक्षिण कोरिया, तैवानसह अन्य देशांच्या गुंतवणुकदारांचे प्रतिनिधी सध्या राज्य सरकारच्या प्रतिनिधींसह चर्चा करीत आहेत. गुंतवणूक प्रस्ताव वेगाने अंमलात यावेत व महाराष्ट्राचे आकर्षण वाढावे, यासाठी तपशीलवार धोरण तयार करण्यात येत आहे. औद्योगिक सुरक्षेत कोणतीही तडजोड न करता अन्य प्रोत्साहने वाढवून गुंतवणूक आकर्षित करण्यावर भर देण्यात येत आहे. उद्योग विभागाचे प्रधान सचिव वेणुगो...

आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्राबाबत भाजपची भूमिका दुटप्पी ... फडणवीस, मुनगंटीवार यांना टोला ... सत्तेत असताना पाच वर्षे मूग गिळून गप्प का होते?- सुभाष देसाई

मुंबई, दि. २ : मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय  केंद्र    ( IFSC - International Financial Services Centre ) गुजरातमध्ये हलविण्यात येत असून याला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार हेच नेते जबाबदार असल्याची टीका उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली आहे. मागील पाच वर्षे सत्तेत असताना फडणवीस व मुनगंटीवार मूग गिळून का गप्प होते, यांनी याबाबत केंद्र सरकारला एकही पत्र का पाठविले नाही, असा सवाल श्री. देसाई यांनी उपस्थित केला आहे. श्री. देसाई म्हणाले की, मुंबईतील बांद्रा कुर्ला संकुल परिसरात आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र व्हावे, यासाठी मी अनेकदा प्रयत्न केले. वित्तीय सचिव, नगरविका सचिव तसेच उद्योग सचिवांच्या बैठक घेतल्या. याशिवाय मंत्रिमंडळ बैठकीत दोनवेळा हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु फडणवीस व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याकडे दुर्लक्ष केले. केंद्रातील भाजप नेते डोळे वटारतील म्हणून हे नेते मूग गिळून गप्प होते. वित्तीय केंद्रासाठी एमएमआरडीने सेझ प्रस्तावित केला होता. त्याला मी दोन वेळा मुदतवाढ देखील दिली होती. परंतु दिल...

U.S. Supports “Passage to Prosperity: India-Afghanistan International Trade and Investment Show”

Image
U.S. Supports “Passage to Prosperity: India-Afghanistan International Trade and Investment Show” Opening in Mumbai The second annual four-day “Passage to Prosperity: India-Afghanistan  International Trade and Investment Show” opened today in Mumbai, India. Sponsored by the United States government through the U.S. Agency for International Development (USAID) the international forum is designed to showcase Afghan business and investment opportunities and bolster trade. This year there are more than 2,000 Afghan, Indian, U.S. and other international registered participants in the show, including more than 200 Afghan businesses, 1,200 Indian business leaders, and 100 international firms. The show showcases the best of Afghan products, services, and business opportunities in luxury goods, agriculture, energy, health, education, mining and heavy industry, and more. Held at the JW Marriott – Mumbai Sahar Hotel, the show features panel discussions on doing business in Af...