Tuesday, October 1, 2024

प्रबोधन-मार्मिक कथा स्पर्धेला देशभरातून भरघोस प्रतिसाद


*मुंबई : *प्रबोधन गोरेगाव आणि साप्ताहिक मार्मिक* यांच्यातर्फे आयोजित *साहित्य सेवक वसंत तावडे स्मृती कथा स्पर्धेला* देशभरातून  उदंड प्रतिसाद लाभला असून ३० सप्टेंबर या मुदतीअंती १००हून अधिक कथा स्पर्धेसाठी पाठविल्या गेल्या आहेत. 


साहित्यसेवक वसंत तावडे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या कथेला ११ हजार रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार असून द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या कथांना अनुक्रमे 5 हजार आणि 3 हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाईल. त्याशिवाय दोन कथांना २५०० रुपयांचा उत्तेजनार्थ पुरस्कारही देण्यात येणार आहे. 


स्पर्धेचा निकाल लवकरच जाहीर होईल आणि विजेत्यांना पुरस्कार प्रदान केले जातील. पुरस्कारविजेत्या कथा साप्ताहिक मार्मिकमध्ये प्रसिद्धही केल्या जाणार आहेत.

No comments:

15th edition of Sunday Soul Sante, India's leading lifestyle and flea market.

S unday Soul Sante - Diwali Edition 2025 Celebrating 15 years, Sunday Soul Sante has grown from a flea market into a cultural movement, unit...