Tuesday, August 26, 2025

अंधेरीचा राजा - आझाद नगर सार्वजनिक उत्सव समिती



26 ऑगस्ट 2025 : आझाद नगर सार्वजनिक उत्सव समितीला अत्यंत अभिमानाने जाहीर करावयाचे आहे की, यावर्षी गणेशोत्सवाचा ६०वा वर्ष (हीरक महोत्सव) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. गेल्या सहा दशकांपासून हा उत्सव भक्ति, एकता आणि सांस्कृतिक अभिमान यांचे प्रतीक ठरत आला आहे, ज्यात सर्व धर्मांचे आणि पिढ्यानपिढ्यांचे लोक एकत्र येत आहेत.

आझाद नगर सार्वजनिक उत्सव समितीची स्थापना सन १९६६ मध्ये झाली. मागील ५९ वर्षांपासून समिती मोठ्या भक्तिभावाने आणि वैभवात गणेशोत्सव साजरा करत आहे. गणेशोत्सवा बरोबरच समिती वर्षभरात अनेक सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम राबवते, जसे की –

दहीहंडी उत्सव, नवरात्री उत्सव, दिवाळी फट आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती.

वैद्यकीय शिबिरे, क्रिकेट स्पर्धा व क्रीडा उपक्रम (आझाद नगर परिसरातील रहिवाशांसाठी).

आदिवासी कुटुंबांना (पालघर येथे) कपडे, कडधान्य व धान्याचे वाटप.

“गुणगौरव सोहळा” द्वारे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व सन्मान.


 मूर्ती स्थापना

दिनांक: २७ ऑगस्ट २०२५

वेळ: सकाळी ११.०० वाजता पूजा प्रारंभ, दुपारी १२.०० वाजता पहिली आरती.

दुपारी १.०० वाजल्यापासून सर्व भाविकांना दर्शनासाठी प्रवेश दिला जाईल.

सजावट / थीम

या विशेष हीरक महोत्सवानिमित्त, समितीने जगप्रसिद्ध “सारंगपूर कष्टभंजन देव हनुमानजी मंदिर” (गुजरात) याची भव्य प्रतिकृती साकारली आहे.

हे मंदिर जगभरातील भाविकांना दुःख व संकटांतून मुक्ती (कष्टभंजन) मिळवण्यासाठी अत्यंत पूज्य आहे.

येथे ३२ फूट उंच हनुमानजींची मूर्ती (अचूक प्रतिकृती) उभारण्यात आली आहे.

ही मूर्ती पूर्णपणे फायबर मटेरियलमध्ये तयार करण्यात आली असून, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ती अनेक वर्षे पुन्हा वापरण्यास योग्य असेल.

संपूर्ण सेटअप ५,००० चौ.फुट क्षेत्रात पसरलेला असून, तब्बल ९० दिवसांत ७० हुन अधिक कुशल कारागिरांनी साकारला आहे.

या संपूर्ण भव्य रचनेचे मार्गदर्शन कला दिग्दर्शक धर्मेश शाह यांनी केले आहे.

रचना पर्यावरणपूरक व पुनर्वापरयोग्य आहे.

गणेशोत्सवासोबत समितीने सांस्कृतिक कार्यक्रम, भजन संध्या, वैद्यकीय शिबिरे व सामाजिक जनजागृती उपक्रम आयोजित केले असून, भक्ती आणि समाजसेवेचे संगम कायम ठेवला आहे.

सर्व भाविक, रहिवासी आणि हितचिंतकांना आवाहन आहे की, या वर्षी श्री गणेश आणि सारंगपूर कष्टभंजन हनुमानजींचा दिव्य उत्सव आझाद नगर येथे अनुभवावा.

सुरक्षा व्यवस्था

मंडप परिसर व बाहेरील स्टॉल्ससाठी काटेकोर सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे –

४० CCTV कॅमेरे

३२ अग्निशामक सिलिंडर

पुरुष व महिला सुरक्षा रक्षक, मंडळाचे स्वयंसेवक आणि पोलिसांची विशेष मदत.

तसेच, ३ मेटल डिटेक्टर दरवाजे, ४ हँड डिटेक्टर व २० वॉकी-टॉकी च्या साहाय्याने भाविकांच्या सुरक्षेची पूर्ण खबरदारी घेतली जाईल.

विमा संरक्षण

संपूर्ण गणेशोत्सवाचा कार्यक्रम विम्याखाली संरक्षित आहे.

दर्शन पद्धती

सर्व भाविकांना बाप्पाचे चरनस्पर्श दर्शन घेण्याची संधी उपलब्ध करून दिली जाईल.


विसर्जन

दिनांक: १० सप्टेंबर २०२५ (बुधवार – संकष्टी)

वेळ: सायं. ६.०० वाजल्यापासून प्रारंभ

✨ या वर्षी, सारंगपूर कष्टभंजन हनुमान मंदिराची भव्य प्रतिकृती अनुभवण्यासाठी आणि ऐतिहासिक ६०वा गणेशोत्सव (हीरक महोत्सव) साजरा करण्यासाठी सर्वांना अंधेरीचा राजा येथे हार्दिक निमंत्रण.


॥ गणपती बाप्पा मोरया ॥॥ कष्टभंजन हनुमान की जय ॥

No comments:

Reeloid’s 1-Day Vertical Filmmaking Workshop Highlights India’s Potential in the Vertical Entertainment Wave

Mumbai, 16 Sep 2025  – Reeloid successfully hosted its 1-Day Vertical Filmmaking Workshop, bringing together aspiring filmmakers, film stude...