Uber Cool, Hot & Happening in Mumbai

Tuesday, January 9, 2018

संपूर्ण महाराष्ट्रात १०१ ठिकाणी “ माँ तुझे सलाम ’’ संपन्न

पद्मभूषण अन्ना हजारे यांचे प्रतिपादन “प्रत्येक विद्यार्थ्याने तात्या लहाने यांच्या जिद्दीची , संघर्षाची व समाजसेवेची घ्यावी प्रेरणा

सौ. अंजनाबाई लहाने यांच्या सन्मानार्थ संपूर्ण महाराष्ट्रात १०१ ठिकाणी आज “ माँ तुझे सलाम ’’ हा ऐतिहासिक कार्यक्रम संपन्न झाला. विविध स्तरांमधील लोकांनी याला हातभार लावला. प्रत्येक ठिकाणी महान कार्य करणाऱ्या मातांचा सत्कार करण्यात आला. रोटरी क्लब, लायन क्लब व इतर अनेक संस्थांनी विराग मधुमालती यांच्या या कल्पनेला आकार रूप दिले.

अहमदनगर येथील मुख्य कार्यक्रमात पद्मभूषण अन्ना हजारे हे देखील उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना त्यांनी विद्यार्थ्यांनी तात्याराव लहाने यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी व आपले जीवन यशस्वी व सफल करावे असे आवाहन केले. स्नेहालय व अनामप्रेम च्या दिव्यांग विद्यार्थांनी हृदयस्पर्शी गीते सदर केली. या माध्यमातून विद्यार्थ्यांना व समाजातील प्रत्येक वर्गाला नवचैतन्य , प्रेरणा व शून्यातून विश्व निर्माण करण्याची उमेद मिळेल. शिवाय अवयवदान व आईची हृदयस्पर्शी सत्यकथा बघावयास मिळणार आहे असा विश्वास अनेक विश्वविक्रम नोंदविणारे निर्माते दिग्दर्शक विराग मधुमालती यांनी व्यक्त केला आहे.
आईची निस्वार्थ भावना, त्याग यातूनच कितीतरी महान समाजवंताचा जन्म झाला ज्यांनी मानवतेला व
समाजाला एक नवीन दिशा देण्याचे कार्य केले. त्यातील एक म्हणजे पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने. त्यांच्या
आईने म्हणजे सौ. अंजनाबाई लहाने यांनी तात्यारावांना आपल्या एका किडनीचे दान देऊन त्यांना दुसऱ्यांदा
जन्म दिला व मुलाने देखील हा जन्म सत्कारणी लावला व लाखो दृष्टीहीन लोकांना दृष्टी दिली

या चित्रपटाने आधीच एक विश्वविक्रम करून Guinness World Records मध्ये नांव नोंदविले असून निर्माता /
दिग्दर्शक विराग मधुमालती यांच्या नावे आजवर ४ विश्वविक्रम आहे. दिव्यांगांचे दु:ख जगापर्यंत
पोहोचविण्यासाठी व नेत्रदानाच्या प्रचारासाठी १०० दिवस विराग यांनी स्वत:च्या डोळ्यांवर पट्टी बांधून
जनहिताचे कार्य केले आहे. या चित्रपटात अभिनेता मकरंद अनासपुरे हे डॉ. लहाने यांच्या प्रमुख भूमिकेत असून, अलका कुबल ह्या त्यांच्या आई अंजना बाईंच्या भूमिकेत आहेत. डॉ. रागिणी पारेख यांच्या भूमिकेत डॉ निशिगंधा वाड असून भारत गणेशपुरे व रमेश देव यांनीही विशेष भूमिका साकारल्या आहेत. महत्वाचे म्हणजे चित्रपटाच्या उत्पन्नातून समाजसेवेचा वसा पुढे जावा या उदात्त हेतूने गोरगरीबांसाठी धर्मदाय डोळ्यांचे नेत्रालय उभारण्याचा डॉ. तात्याराव लहाने व विराग मधुमालती यांचा मानस आहे.

अहमदनगर येथील कार्यक्रमात विराग मधुमालती, डॉ. गिरीश कुलकर्णी, डॉ. प्रकाश व सुधा कांकरिया, वंदना
वानखडे, प्रस्तुकर्ती रीना अग्रवाल, रोटरी क्लब चे अध्यक्ष, अनिल सानप व बरेच मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment